Ajit Pawar Passed Away : अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे जनसमुदायाची लोटला सागर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:15 IST2026-01-28T19:15:26+5:302026-01-28T19:15:48+5:30
- सुरुवातीला शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सर्वांसाठी पार्थिव दर्शनासाठी खुले करण्यात आले.

Ajit Pawar Passed Away : अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे जनसमुदायाची लोटला सागर
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अंत दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी केले आहेत. सायंकाळी चार वाजल्यापासून कार्यकर्ते विद्या प्रतिष्ठान येथे जमले आहेत. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात प्रचंड जनसमुदाय एकवटला आहे.
बुधवारी सकाळी नऊ वाजता विमान अपघातात राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर बारामतीसह राज्यातील कार्यकर्ते विद्या प्रतिष्ठान येथे एकत्रित जमू लागले. दुपारी चार वाजल्यापासून हजारो कार्यकर्ते विद्या प्रतिष्ठान येथे आले आहेत. परंतु रात्री सात नंतर अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान येते आणण्यात आले. सुरुवातीला शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सर्वांसाठी पार्थिव दर्शनासाठी खुले करण्यात आले.
लाखो कार्यकर्ते विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी एक तास वाट पाहत थांबले आहेत. कार्यकर्त्यांची गर्दी जास्त झाल्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी सर्व नागरिक थांबले होते.