शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एजंटांना अधिकृत परवाना द्यावा

By admin | Updated: January 21, 2015 00:33 IST

अनेक वर्षांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयासह (आरटीओ) बहुतेक सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये एजंटांमार्फत कामे केली जातात.

पुणे : अनेक वर्षांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयासह (आरटीओ) बहुतेक सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये एजंटांमार्फत कामे केली जातात. आता ही समाजाची एक गरज बनली आहे. त्यामुळे केवळ आरटीओतील एजंट हद्दपार करून त्यांच्यावर अन्याय करू नये. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या काही एजंटांमुळे सर्वांनाच काम करू न देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांना अधिकृत परवाना द्यावा, अशी मागणी पुणे आरटीओमधील एजंटांनी केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी आंदोलनही करण्यात आले.परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी राज्यातील सर्व आरटीओतील एजंटगिरीला आळा घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे आरटीओंनी सोमवारी आवारातील सर्व एजंटांना पोलिसांच्या मदतीने हद्दपार केले. याला विरोध करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे माजी सदस्य व महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.(प्रतिनिधी)पुणे विभागात सुमारे ४० ते ५० टक्के काम एजंटांमार्फत केले जाते. प्रामाणिक एजंट काम करून नागरिकांना मदत करतात, त्यांना शासनाने व्यवसायाचा अधिकृत परवाना देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नियमावली करावी. गैरप्रकार घडल्यास संबंधित एजंट जबाबदार धरला जाईल. कामाचे दर निश्चित केल्यास आर्थिक फसवणूकही होणार नाही. - बाबा शिंदे , अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना