शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वास्तवदर्शी आकडेवारी सादर केल्यावरच पाण्याचा कोटा वाढवून मागणार : सौरभ राव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 07:00 IST

जलसंपदाला महापालिका दोष देत नाही, देणार नाही असे स्पष्ट करून राव म्हणाले, त्यांची आकडेवारी खरी असेल, मात्र शहराला खरोखर किती पाणी मिळते हेही पाहायला हवे.

ठळक मुद्देजलसंपदाचे आकडे खरे, वस्तुस्थिती वेगळी जनगणना विभागाकडून पुणे शहराची नक्की लोकसंख्येचा निश्चित आकडा घेण्यात येईलग्रामपंचायती, मोठ्या टाऊनशीप, काही उद्योग यांना रोज साधारण १५० एमएलडी पाणी येत्या आठ ते दहा दिवसात हा अहवाल तयार पर्वतीपासून लष्कर जलकेंद्रापर्यंत पाईपमधून पाणी न्यायचे काम नोव्हेंबरमध्ये पुर्ण होणारपाच तास पाणी हे पिण्याच्या पाण्याचे नियोजनही पाणी वाचवण्याचाच भाग

पुणे: जलसंपदा देते ती पाण्याची आकडेवारी खरी असेल. मात्र ती तांत्रिक आहे. प्रत्यक्षातील गोष्टीत अनेकदा तफावत असते. आता आम्ही लोकसंख्येची व गरजेची वस्तूनिष्ठ आकडेवारी सादर करूनच कोटा वाढवून देण्याची मागणी करू असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.जलसंपदाला महापालिका दोष देत नाही, देणार नाही असे स्पष्ट करून राव म्हणाले, त्यांची आकडेवारी खरी असेल, मात्र शहराला खरोखर किती पाणी मिळते हेही पाहायला हवे. काही गोष्टी तांत्रिकदृष्ट्या दिसत असतात, प्रत्यक्षात मात्र तसे नसते. पण त्यावर टिका करण्याऐवजी आम्ही काही आकडेवारी जमा करत आहोत. जनगणना विभागाकडून पुणे शहराची नक्की लोकसंख्येचा निश्चित आकडा घेण्यात येत आहे. जनगणना झाली त्या वर्षापासून आतापर्यंत त्यात किती वाढ झाली तेही पाहिले जाणार आहे. गेल्या काही वर्षात पुणे शहरात येणाऱ्या , वर्ष सहा महिने राहणाऱ्या नागरिकांच्या संख्येत कितीतरी वाढ झाली आहे. त्याला फ्लोटिंग लोकसंख्या म्हणतात. किमान ५ लाख जणांची अशी ये-जा असावी. ते लोक इथे राहतात, त्यांना पाणी लागतेच. त्याशिवाय महापालिकेच्या परिघाबाहेर ५ किलोमीटर अंतरापर्यंतच्या ग्रामपंचायती, मोठ्या टाऊनशीप, काही उद्योग यांना रोज साधारण १५० एमएलडी पाणी द्यावे लागते. तेवढी तूट शहराच्या पाण्यात येते, मात्र ती जमेस धरली जात नाही. अशा काही गोष्टी आहेत. त्याचा अहवाल महापालिका तयार करत आहे. हा अहवाल सरकारकडे म्हणजे जलसंपदाकडे दिला जाईल. तो दाखवूनच आम्ही वाढीव कोट्याची मागणी करू. येत्या आठ ते दहा दिवसात हा अहवाल तयार होईल.’’महापालिकेच्या पाणी वितरण यंत्रणेत काही दोष आहेतच. ते महापालिका नाकारत नाही असे कबूल करून राव म्हणाले, ‘‘ पर्वतीपासून लष्कर जलकेंद्रापर्यंत पाईपमधून पाणी न्यायचे काम नोव्हेंबरमध्ये पुर्ण होणार आहे. फक्त या एका कामातून १०० ते १५० एमएलडी पाणी वाचणार आहे. त्याचा शहराला उपयोग होईल. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती आहे. त्याचा शोध घेण्याची व ती गळती दूर करण्याची मोहिमच सुरू केली आहे. त्याचाही उपयोग होणार आहे. शहरातील पाणी योजना जुनी असल्याने स्थानिक स्तरावरही काही ठिकाणी मोठी गळती होऊन पाणी वाया जाते. काहीवेळा तांत्रिक अडचणींमुळेही पाईप फुटतात व तेवढे पाणी वाया जाते. हे सर्व प्रकार बंद व्हावेत अशा दृष्टिने महापालिका प्रयत्नशील आहे.’’पाच तास पाणी हे पिण्याच्या पाण्याचे नियोजनही पाणी वाचवण्याचाच भाग आहे असे राव यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘उपलब्ध पाणी साठा नियोजन करून वापरण्याचाच तो एक भाग आहे. नव्याने ते करताना काही त्रुटी, गोंधळ निर्माण होतील हे अपेक्षित धरले होते. त्याप्रमाणे काही ठिकाणी तसे झाले. अशा त्रुटी पाणी पुरवठा विभागामार्फत त्वरीत दूर करण्यात येत आहेत. सर्वांना समान पाणी मिळावे, ते पुरेशा दाबाने मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यातही काही तांत्रिक गोष्टींमुळे अडचणी निर्माण होतात. त्या पुर्ण करण्यात वेळ जातो.शहराच्या एखाद्या भागातही पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये अशीच महापालिकेची भूमिका आहे. मात्र एखाद्या भागात असा प्रश्न निर्माण झाला म्हणजे संपुर्ण शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली असे होत नाही असेही राव यांनी सांगितले. ज्या भागातून तक्रारी येतात तिथे पाण्याचे टँकर पाठवले जात आहेत. तो काही कायमचा उपाय नाही हे बरोबर आहे. त्यामुळे तिथे दुरूस्तीचे, त्रुटी दूर करण्याचे कामही त्वरीत केले जात आहे असे राव म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSaurabh Raoसौरभ राव