शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर प्रेमवीराने 'अशा' प्रकारे व्यक्त केला संताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 12:54 PM

प्रेयसी रिक्षावाल्याबरोबर पळून गेल्याच्या रागातून रिक्षाचालकांचे मोबाईल चोरण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता..

ठळक मुद्देदोघांना अटक : बिबवेवाडीतील घटना

पुणे : प्रेयसी रिक्षावाल्याबरोबर पळून गेल्याच्या रागातून रिक्षाचालकांचे मोबाईल चोरण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने रागाच्या भरात एका प्रेमवीराने मित्राच्या मदतीने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करुन त्यांची तोडफोड केली. बिबवेवाडी पोलिसांनी दोघांनाही तातडीने अटक केली आहे. शरद तुकाराम पाटोळे (वय २०, रा़ टिळेकरनगर) आणि कुमार गोपाळ राठोड (वय १९, रा़ अण्णाभाऊ साठेनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़  या दोघांनी रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा ८ वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार अण्णाभाऊ साठेनगर येथील गुलमोहोर कॉलनीत मध्यरात्री एक वाजता घडला.

याप्रकरणी जमीर शमशुद्दीन शेख (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पाटोळे याचे एका तरुणीबरोबर पे्रमसंबंध होते. मात्र, तरुणीच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नास विरोध होता़ तर शरद याने अनेकदा प्रयत्न करुनही त्यांनी  प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शरद याने त्यांच्या घराच्या परिसरात गोंंधळ घालून त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीच्या आईचा विरोध कायम होता. यामुळे चिडलेल्या शरद याने कुमार राठोड याच्या मदतीने मध्यरात्री या तरुणीच्या घराजवळील पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक केली. त्यात ४ रिक्षा, एक रिक्षा टेम्पो, २ मोटारी, दुचाकी यांचे नुकसान केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. ़़़़़़़़़़नकारामुळे तोडफोडप्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने चिडून आरोपीने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी

टॅग्स :Puneपुणेfour wheelerफोर व्हीलरrelationshipरिलेशनशिपmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस