शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
2
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
3
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
4
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
5
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
6
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
7
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
8
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
9
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
10
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
11
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
12
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
13
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
14
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 5:46 AM

२००८ मध्ये लग्न झालेल्या एका जोडप्याला २०१२ मध्ये मुलगा झाला. २०१८ मध्ये नवऱ्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

- डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘कलम ४९८ अ’ आयपीसीच्या (विवाहितेचा छळ) वाढत्या गैरवापराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ‘४९८ अ’मध्ये अटकेवर प्रतिबंध लावल्यानंतर आता कायद्यात दुरुस्तीची शिफारस आहे.

२००८ मध्ये लग्न झालेल्या एका जोडप्याला २०१२ मध्ये मुलगा झाला. २०१८ मध्ये नवऱ्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्याच्याविरोधात २०२० मध्ये पत्नीने ‘४९८ अ’चा गुन्हा दाखल केला. हायकोर्टाने गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्यानंतर, पतीने  या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. आरोपींना त्रास देण्याच्या हेतूने फौजदारी कारवाई सुरू असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. पत्नींच्या सर्वच तक्रारींत ‘४९८ अ’ कलम यांत्रिक पद्धतीने लावू नये, असे निर्देशही न्यायाधीश जे. बी. परडीवाला आणि मनोज मिश्रा यांनी पोलिसांना दिले. 

काय म्हणाले कोर्ट ?n२०१० मध्येही ‘४९८ अ’ तक्रारींत घटनांच्या अतिशयोक्तीपूर्ण वर्णनाबद्दल चिंता व्यक्त केली होती.nतेव्हाही यात बदलासाठी विधिमंडळाचे लक्ष वेधले होते.nकलम ८५ आणि ८६ भारतीय न्याय संहितामधील तरतुदी ‘आयपीसी ४९८ अ’चे शब्दशः पुनर्लेखन केलेले आहे.nविधिमंडळाने या समस्येकडे लक्ष द्यावे, असेही सांगितले. nभारतीय न्याय संहिता लागू होण्यापूर्वी व्यावहारिक वास्तवांचा विचार करून आवश्यक बदल करण्याचा विचार करावा.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयWomenमहिला