शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 6:39 AM

संरक्षण दलाची दोन वाहने सुरणकोट भागातील सनई टॉपकडे जात असताना त्यांच्यावर शशिधर या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला.

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यामध्ये शनिवारी संरक्षण दलाच्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला, तर चार  जवान जखमी झाले. ताफ्यातील एक वाहन हवाई दलाचे होते. लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या फेरीत २५ मे रोजी अनंतनाग-राजौरी मतदारसंघात मतदान होणार आहे. पूंछ हा त्याच मतदारसंघाचा भाग आहे.

संरक्षण दलाची दोन वाहने सुरणकोट भागातील सनई टॉपकडे जात असताना त्यांच्यावर शशिधर या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचे वृत्त कळताच राष्ट्रीय रायफल युनिटच्या जवानांनी शशिधर भागाला वेढा दिला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. या घटनेत जखमी झालेल्या जवानांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. पूंछ शहरामध्ये व परिसरात दहशतवाद्यांचा वावर असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच निमलष्करी जवानांनी शुक्रवारपासून त्या शहरात काही ठिकाणी धाडी घातल्या होत्या. मात्र त्यावेळी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

गेल्या वर्षी २१ डिसेंबरला बुफ्लियाझ येथे लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद व तीन जवान जखमी झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच कृष्णा घाटी येथे दहशतवाद्यांनी लष्करी वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार केला होता. मात्र, त्यात जीवितहानी वा कोणी जखमी झाले नव्हते. (वृत्तसंस्था)

असे झाले गेल्या काही वर्षांत दहशतवादी हल्लेnपूंछच्या सीमेवर ढेरा की गली व बुफ्लियाझ या भागादरम्यान गेल्या वर्षी २० एप्रिल रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते.nगेल्या वर्षी मे महिन्यात चामेर जंगलात दहशतवादविरोधी मोहिमेत मेजर पदावरील अधिकारी व पाच जवान शहीद झाले.n२०२२मध्ये राजौरी जिल्ह्यातील दरहाल भागात परघाल येथे लष्करी छावणीवरील हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते.n११ ऑक्टोबर २०२१ रोजी दोन स्वतंत्र हल्ल्यांत नऊ जवान शहीद झाले. १४ ऑक्टोबर रोजी एका हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर