शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 6:06 AM

निवडणुकीदरम्यान व्यावहारिक दृष्टिकोन अवलंबला पाहिजे, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना, न्यायिक हस्तक्षेप व्यत्यय निर्माण करणारा ठरू शकतो, असे स्पष्ट करताना लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीचा डेटा ४८ तासांच्या आत वेबसाइटवर टाकण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. निवडणुकीदरम्यान व्यावहारिक दृष्टिकोन अवलंबला पाहिजे, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.

आयोगाने १९ एप्रिलच्या पहिल्या टप्प्यानंतर ११ दिवसांनी, तर २६ एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर ४ दिवसांनी ३० एप्रिल रोजी मतदानाची अंतिम टक्केवारी प्रसिद्ध केली होती. त्यात प्रारंभीची टक्केवारी व अंतिम टक्केवारीमध्ये ५.७५ टक्क्यांची तफावत आढळली. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स व कॉमन कॉज यांनी संयुक्तपणे, तसेच मोहुआ मोईत्रा यांनी याचिका दाखल केल्या होत्या. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे व अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला.  

काय म्हणाले न्यायालय?यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून, शनिवारी सहाव्या टप्प्याचे मतदान आहे. अशा स्थितीत मतदानकेंद्रनिहाय मतदानाची प्रमाणित आकडेवारी ४८ तासांच्या आत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाला देता येणार नाही, कारण आयोगाला डेटा अपलोड करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ जमवणे अवघड ठरेल, असे न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या अवकाशकालीन पीठाने नमूद केले. 

निवडणूक आयोगाचे काय म्हणणे?फॉर्म १७ सीच्या आधारे टक्केवारी जाहीर केल्यास त्यात पोस्टल बॅलेटचाही समावेश असल्याचा समज होऊन भ्रम निर्माण होऊ शकतो.फॉर्म १७ सी केवळ उमेदवाराच्या प्रतिनिधीलाच दिला जातो. त्यातून सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत संभ्रमामुळे अव्यवस्था निर्माण होऊ शकते, असे आयोगाने २२ मे रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर याचिका दाखल करण्यात आल्यामुळे त्याचे निराकरण करणे विवेकाचे ठरणार नाही, असा युक्तिवाद आयोगाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मणिंदर सिंह यांनी केला.

फॉर्म १७ सी मध्ये कोणती माहिती?- ईव्हीएमचा सीरियल नंबर काय?- मतदान केंद्रावर मतदारांची संख्या किती?- १७- ए अंतर्गत मतदारांच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेल्या मतदारांची एकूण संख्या किती?- किती मतदारांना ४९-एएम अंतर्गत मतदान करू देण्यात आलेले नाही?- ईव्हीएममध्ये नोंदवण्यात आलेल्या मतांची संख्या किती?- बॅलेट पेपर्सची संख्या किती?- सहा पोलिंग एजंटच्या सह्या- निवडणूक अधिकाऱ्याची सही- फॉर्मवर मतमोजणीच्या दिवशी कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली, ते लिहिले जाते.- निवडणूक अधिकाऱ्याने मतांची माहिती भरून मतदान संपल्यानंतर ही माहिती पोलिंग एजंटला द्यायची असते.

आ बैल मुझे मार... : व्हाेटर टर्नआऊट ॲप संदर्भात आयाेगाची अवस्था ‘आ बैल मुझे मार’ अशी झाली आहे, असे न्यायालयाने म्हटले. काेणतेही वैधानिक बंधन नसताना आयाेगाने मतदानाची रियल टाइम आकडेवारी जनतेला देण्यासाठी हे ॲप सुरू केले आहे. या ॲपबद्दल न्या. दत्ता यांनी गेल्या सुनावणीत आयाेगाच्या वकिलांना विचारणा केली हाेती. त्यावेळी न्यायालयाने टिप्पणी केली नव्हती. मात्र, आता डेटा वेळेत देण्यास आयाेगाला अपयश येत असल्याच्या पाश्वर्वभूमीवर न्यायालयाने ‘आ बैल मुझे मार’ असे आयाेगाच्या स्थितीचे वर्णन केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४