शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 6:24 AM

- प्रसाद आर्वीकर लोकमत न्यूज नेटवर्क चंडीगड : फोडाफोडीच्या राजकारणाने विरोधकांनी जेरीस आणलेल्या काँग्रेसने अखेर शनिवारी चार उमेदवारांची घोषणा ...

- प्रसाद आर्वीकरलोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : फोडाफोडीच्या राजकारणाने विरोधकांनी जेरीस आणलेल्या काँग्रेसने अखेर शनिवारी चार उमेदवारांची घोषणा करीत नवा डाव टाकला आणि विरोधकांवर अप्रत्यक्ष घाव केले आहेत. या खेळीने भाजपसह ‘आप’चे टेन्शन वाढले आहे.

विद्यमान खासदारांसह प्रबळ दावेदार असणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देत निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला खिळखिळे करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच उमेदवारी यादी जाहीर करताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अगदी सावध भूमिका घेतली. दुसऱ्या यादीत काँग्रेसने लुधियानामधून प्रदेशाध्यक्ष अमरदीपसिंग राजा वडिंग, आनंदपूर साहीब मतदारसंघातून माजी खासदार विजय इंदर सिंगला, गुरुदासपूर मतदारसंघातून काँग्रेसचे महासचिव सुखजिंदरसिंग रंधावा आणि खुड्डूरसाहिब मतदारसंघातून माजी आमदार कुलबीरसिंग जिरा यांच्या नावाची उमेदवार म्हणून  घोषणा केली आहे. या घोषणेने भाजपसह ‘आप’ची धडधड वाढली आहे. 

आनंदपूरसाहिब येथून काँग्रेसने विजय इंदर सिंगला यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत आपचे प्रवक्ता मलविंदर सिंग कांग, अकाली दलाचे माजी खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा यांच्याशी होईल. या मतदारसंघात भाजपने अजून उमेदवार घोषित केला नाही. 

उमेदवार देताना काॅंग्रेसने केले अनेक फेरबदल काँग्रेसने उमेदवारी देताना फेरबदल केले आहेत. आनंदपूरसाहिब येथे विद्यमान खासदार मनीष तिवारी यांच्या जागी विजय इंदर सिंगला यांना, तर मनीष तिवारी यांना चंडीगडमधून तिकीट दिले आहे, तर खुड्डूरसाहिबमध्येही विद्यमान खासदार जसबीरसिंग गिल यांचे तिकीट कापले आहे. 

लुधियानात स्वकीयांशीच सामनालुधियाना मतदारसंघातील लढत सर्वांचेच लक्ष वेधणारी ठरत आहे. तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे अमरिंदरसिंग राजा वडिंग यांची लढत भाजपचे उमेदवार खासदार रवनीतसिंग बिट्टू यांच्याशी होत आहे. बिट्टू हे या मतदारसंघाचे दोन टर्म काँग्रेसकडून खासदार राहिलेले आहेत. मार्च महिन्यातच त्यांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात स्वकीयांसोबत लढताना काँग्रेसचा कस लागणार आहे. 

काँग्रेसचे उपमुख्यमंत्री लोकसभेच्या रिंगणातnकाँग्रेसचे रंधावा यांची लढत गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे दिनेश बब्बू, अकाली दलाचे दलजितसिंग चिमा आणि आपचे अमंशेर सिंग शेरी कलसी यांच्यासोबत आहे. nकाँग्रेसचे रंधावा हे चरणजित चन्नी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. चार वेळा आमदार राहिलेले रंधावा राजस्थान काँग्रेसचे प्रभारीही आहेत.काँग्रेसपुढे भाजप, आपचे आव्हानखुड्डूरसाहिब मतदारसंघात काँग्रेसचे जिरा यांची लढत आपचे लालजितसिंग भुल्लर, भाजपचे मनजितसिंग मन्ना मियांविंड, अकाली दलाचे वीरसासिंग वल्टोहा आणि अपक्ष अमृतपाल सिंग यांच्याशी होईल.

टॅग्स :punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024