शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाठलाग करून चोरटे केले जेरबंद

By admin | Updated: September 27, 2016 04:27 IST

शहरातील स्थानिक चोरट्यांना हाताशी धरून ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या वसईतील संशयित चोरट्यास पिंपरी पोलिसांनी शिताफीने अटक केली. वाकड पोलीस ठाण्याच्या

पिंपरी : शहरातील स्थानिक चोरट्यांना हाताशी धरून ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या वसईतील संशयित चोरट्यास पिंपरी पोलिसांनी शिताफीने अटक केली. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या करणाऱ्या दोन आरोपींना वाकड पोलिसांच्या स्वाधीन केले. पिंपरी पोलिसांच्या पथकाने वसईतील वाकी फाटा, नायगाव येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. १४ तोळे सोन्याचे दागिने, दूरचित्रवाणी संच, लॅपटॉप, होम थिएटर, दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी मोटार असा एकुण ९ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयित आरोपी राहुल उर्फ शेंड्या सीताराम थोरात (वय २४, वाकी फाटा, नायगाव, वसई) याच्यासह त्याचा साथीदार रणवीरसिंह बलबीरसिंह सहोता (वय २५, भोसरी), अक्षय बाळू सोनवणे (वय २०, रत्नदीप सोसायटी, निगडी) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. राहुल उर्फ शेंड्या थोरात याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. आरोपींकडून १४ तोळे सोन्याचे दागिने, दूरचित्रवाणी संच, लॅपटॉप, होम थिएटर, दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी मोटार असा एकूण ९ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. घराचे पत्रे उचकटून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना फिल्मी स्टाइलने पोलिसांनी पाठलाग करून पकडले. वाकड, पिंपरी आणि परिसरात झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची कबुली या चोरट्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)घरफोड्या करणारी चार अल्पवयीन मुले भोसरी पोलिसांना आढळून आली. सोमवारी सकाळी भोसरी परिसरातून त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील सुमारे १ लाख २९ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी भोसरी परिसरातून १३ ते १५ वयोगटातील चार अल्पवयीन मुले पोलिसांना ताब्यात घेतली. ही कारवाई परिमंडल तीनचे उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या पथकाने केली.