माहुरला २० वर्षानंतर झाले सत्तांतर

By Admin | Updated: August 8, 2015 00:43 IST2015-08-08T00:43:50+5:302015-08-08T00:43:50+5:30

पुरंदर तालुक्याच्या ५७ ग्रामपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले असल्याची माहिती

After 20 years, the mahur has been postponed | माहुरला २० वर्षानंतर झाले सत्तांतर

माहुरला २० वर्षानंतर झाले सत्तांतर

सासवड : पुरंदर तालुक्याच्या ५७ ग्रामपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण यांनी दिली. येथील माहूर ग्रामपंचायतीवर २० वर्षांपासून माजी जिल्हा परिषद सदस्य बबूसाहेब माहुरकर यांची सत्ता होती. ९ सदस्यांपैकी या वेळी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे बापूराव खोमणे व दीपाली बापूराव खोमणे या पती-पत्नींसह संदीप भोसले, गजानन जगताप, सुनंदा आतकरी हे ५ सदस्य या ग्रामपंचायतीवर निवडून आल्याने २० वर्षांनतर या ठिकाणी सत्तापरिवर्तन झाले आहे.
निवडणूक निकालानंतर सासवड येथे युवा नेते संजय जगताप व चंदुकाका जगताप यांनी सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार केला. या वेळी जिल्हा परिषद सदस्या मनीषा काकडे, पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, दत्ता झुरंगे, मार्केट कमिटीचे संचालक नंदकुमार जगताप उपस्थित होते.

Web Title: After 20 years, the mahur has been postponed