मराठे ज्वेलर्सचे मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील अ‍ॅड. दीप्ती काळे व निलेश शेलारवर मोक्का कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 01:54 PM2021-04-27T13:54:31+5:302021-04-27T13:55:04+5:30

आणखी एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून जमीन लाटल्याचा गुन्हा

Adv. Mocca action against Deepti Kale and Nilesh Shelar | मराठे ज्वेलर्सचे मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील अ‍ॅड. दीप्ती काळे व निलेश शेलारवर मोक्का कारवाई

मराठे ज्वेलर्सचे मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील अ‍ॅड. दीप्ती काळे व निलेश शेलारवर मोक्का कारवाई

Next
ठळक मुद्देदीप्ती काळे ही टोळीप्रमुख असून मागील १० वर्षात संघटित गुन्हेगारी टोळी सक्रिय

पुणे: मराठे ज्वेलर्सचे मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील टोळीप्रमुख अ‍ॅड. दीप्ती काळे व निलेश शेलार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. अ‍ॅड. काळे हिने इतरांच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकाशी शारीरीक जवळीक साधून त्यांच्याकडून जबरदस्तीने ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करुन घेतली. तसेच आणखी ५८ गुंठे जमीन नावावर करुन देण्यासाठी धमकाविल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

दीप्ती सरोज काळे (रा. बावधन), निलेश शेलार (रा. कोथरुड), नितीन हमने व दोघा अनोळखी व्यक्तीविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील त्यांच्या सोसायटीत २०१९ पासून जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे. 

मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना बेकायदेशीर सावकारीतून मिळालेला पैसा व्याजाने देऊन त्यांच्याकडून दामदुप्पटीने व्याज घेतले. प्रसंगी व्याजापोटी दुकानातील सोने उचलून नेल्याप्रकरणी या महिलेसह निलेश शेलार याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकारानंतर एका बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांशी संपर्क साधून आपल्यावर बेतलेली हकीकत कथन केली. त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. या महिलेने फिर्यादीच्या पतीशी जवळीक साधून त्यांच्याशी शारीरीक संबंध प्रस्तापित केले. त्यांना बांधकाम व्यवसायासाठी ३५ लाख रुपये दिले. त्या बदल्यात त्यांचे पतीकडून मरकळ येथील कोयाळी येथील १०० गुंठे जमिनीपैकी प्रथम २६ गुंठे व त्यानंतर १६ गुंठे अशी एकूण ४२ गुंठे अशी ३ कोटी रुपयांची जमीन तिच्या नावावर करायला भाग पाडले. त्यानंतर उरलेली ५८ गुंठे जमीन तिच्या नावावर करुन दे नाही तर तुझ्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला आयुष्यभर जेलमध्येच सडवेल अशी धमकी दिली. निलेश शेलार व नितीन हमने यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण केली. या महिलेच्या नावावर ५८ गुंठे जमीन करुन द्या, नाही तर तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच या महिलेने तिचे व फिर्यादीच्या पतीचे एकत्रित असलेले फोटो पाठवून मानसिक त्रास दिला. फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने काही वर्षांपूर्वी पुण्यातील मध्य वस्तीतील एका राजकीय पक्षाच्या नेत्याविरुद्ध अशाच प्रकारे बलात्काराचा आरोप करुन खळबळ उडविली होती. त्यानंतर तिच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. 

दीप्ती काळे ही टोळीप्रमुख असून मागील १०  वर्षात संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन प्रत्येक गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे सदस्य घेऊन खुनाचा प्रयत्न, आत्महत्ये प्रवृत्त करणे, कट करुन खंडणी व बनावट व्हिडिओ तयार करुन अपलोड करणे असे गुन्हे केले आहेत.  याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी तयार करुन उपायुक्त प्रियंका नारनवर यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे सादर केला होता. डॉ. शिंदे यांनी त्याची छाननी करुन त्याला मंजूरी दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर मोकका अंतर्गत केलेली ही २८ वी कारवाई आहे़ या वर्षातील ही २३ वी कारवाई आहे.

 

Web Title: Adv. Mocca action against Deepti Kale and Nilesh Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.