शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक योजना : २,५०0 जणांवर मोफत शस्त्रक्रिया

By admin | Updated: May 16, 2015 04:06 IST

ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या सुपरस्पेशालिटी सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शहरातील वैद्यकीय महाविद्यालयांची जिल्हा

पुुणे : ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या सुपरस्पेशालिटी सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शहरातील वैद्यकीय महाविद्यालयांची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मदत घेतली असून, मोफत सर्वरोगनिदान शिबारांमार्फत २,५०२ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी रुग्णांना ७ कोटी ५० लाख ६० हजारांचा येणारा खर्च वाचला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बी.जे. वैद्यकीय, डी.वाय. पाटील, एमआयएमईआर महाविद्यालय, तळेगाव आणि भारती विद्यापीठ या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी पुणे जिल्ह्यातील १३ तालुके दत्तक घेतल आहेत. ‘‘ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या गावामध्येच सुपरस्पेशालिटी सुविधा मिळाव्यात, यासाठी ही पावले उचलली गेली आहेत. दत्तक घेतलेल्या ठिकाणी महाविद्यालयातील विषयतज्ज्ञ प्राध्यापक आणि एम.डी.चे विद्यार्थी जातात. हे पथक तालुक्यांमध्ये जाऊन तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तपासणीबरोबरच आवश्यकता असल्यास शस्त्रक्रियासुद्धा करते. या योजनेंअतर्गत भारती हॉस्पिटलतर्फे वेल्हा तालुक्यातील ८ हजार लोकसंख्या असलेल्या पासली आरोग्य केंद्रात महिन्यातील पहिल्या मंगळवारी बालरोग, स्त्रीरोग, फिजिशियन, व नेत्ररोग या चार तज्ज्ञांच्या मार्फत सेवा दिली जाते. तसेच, या केंद्रांतर्गत कोणताही रुग्ण भारती हॉस्पिटलमध्ये आल्यास त्याच्यावर उपचार केले जातात. आतापर्यंत ५७४ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, ८३ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसह संदर्भसेवा देण्यात आली आहे. हीच सेवा भोर, वेल्हे, मुळशी, दौंड व पुरंदर या तालुक्यांत निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सर्वंकष नेत्रतपासणीसाठीही भारती हॉस्पिटलशी सामंजस्य करार केला असून हवेली, भोर, वेल्हे, दौंड व पुरंदर या तालुक्यांतील २१ प्रथामिक आरोग्य केंद्रांत महिन्यातून एकदा नेत्रतज्ज्ञांची सेवा दिली जाते. आजअखेर ३६६ रुग्णांची तपासणी करून ४० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)