शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

Adar Poonawala: 'सिरम' इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला लंडनहून खासगी विमानाने मायदेशी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 3:52 PM

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आपल्याला लसींच्या मागणीसाठी धमक्यांचे फोन येत असल्याचा खुलासा करत देशभरात एकच खळबळ उडवून दिली होती. .

पुणे : कोरोना संकटात कोविशील्ड लसीच्या निर्मितीद्वारे पहिला आशेचा किरण जागविणारे आणि जगभरातील सर्वात मोठ्या लसनिर्मिती कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मध्यंतरीच्या काळात एकच खळबळ उडवून दिली होती. पूनावाला  यांनी आपल्याला अनेकांकडून धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र,मे महिन्यात अदर पूनावाला आपल्या कुटुंबासह थेट लंडनला निघून गेले होते. आता काम संपवून खासगी विमानाने ते मायदेशी परतले आहे. त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

कोरोना काळात संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ड लसची निर्मिती करत भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर वेगाने उत्पादन करत तात्काळ लसींचा पुरवठा देखील सुरु केला होता.देशात कोरोना लसीकरणाची जोरदार मोहीम सुरु असतानाच अचानक कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने मोठा गोंधळ उडाला होता. याचदरम्यान मे महिन्यात अदर पूनावाला लंडनला निघून गेले होते. त्यांनी कामानिमित्त लंडनला जात असल्याचे सांगत ते संपवून भारतात परतणार असल्याचं जाहीर केले होते.पूनावाला यांनी ‘द टाईम्स’ या युनायटेड किंग्डममधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला मुख्यमंत्री ते उद्योजक अशा अनेकांकडून धमक्या मिळत असल्याचा खुलासा करत देशात एकच खळबळ उडवून दिली होती. 

सिरमचे अदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे लवकरच भारतात परतणार असल्याची माहिती दिली होती. याचसोबत त्यांनी ब्रिटनमध्ये भागीदार आणि भागधारकांसोबत चांगली बैठक झाली असल्याचे देखील सांगितले होते. सिरम  इन्स्टिटयूट केंद्र सरकारला ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान जवळपास ५० कोटी लसींचे डोस पुरवणार आहे. 

अदर पुनावाला धमकीबाबत नेमका काय खुलासा केला होता...कोविशील्ड लसींच्या मागणीसाठी भारतातील मोठ्या व्यक्तींचे वारंवार मला फोन येत असून त्यात काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचाही समावेश आहे. आम्हालाच लस लवकर हवी आहे, असं म्हणत त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेAdar Poonawallaअदर पूनावालाCorona vaccineकोरोनाची लसLondonलंडनIndiaभारत