मुळा नदी वाचवण्यासाठी बाणेरमध्ये चिपको मोर्चा; अभिनेते सयाजी शिंदे व सोनम वांगचुंग यांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:16 IST2025-02-10T13:14:14+5:302025-02-10T13:16:54+5:30
नदी सुधार प्रकल्प हटाव और नदीया बचाव साठी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील हजारोंच्या संख्येने संवेदनशील नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले

मुळा नदी वाचवण्यासाठी बाणेरमध्ये चिपको मोर्चा; अभिनेते सयाजी शिंदे व सोनम वांगचुंग यांचा सहभाग
पुणे - बाणेर येथील मुळा राम नदी संगम येथे हजारोंच्या संख्येने पर्यावरण प्रेमी नागरिकांनी एकत्र येत रविवारी चिपको आंदोलन केले .केंद्र शासन ,राज्य शासन, पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या नदीपात्रातील कामाला विरोध करत झाडे वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये लडाखमधील पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते सोनम वांगचुंग तसेच महाराष्ट्राच्या पर्यावरण चळवळीतील अभिनेते सयाजी शिंदे यांनी लाँग मार्च मध्ये सहभाग घेतला.
मुळा नदी वाचवण्यासाठी बाणेरमध्ये चिपको मोर्चा; अभिनेते सयाजी शिंदे व सोनम वांगचुंग यांचा सहभाग#Punepic.twitter.com/5NvBZgvNmj
— Lokmat (@lokmat) February 10, 2025
नदी सुधार प्रकल्प हटाव और नदीया बचाव साठी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील हजारोंच्या संख्येने संवेदनशील नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी वांगचुक यांनी नागरिकांच्या एकजुटीचे कौतुक केले. नद्या काँक्रीटमुक्त ठेवण्याच्या लढ्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुण्यातील नागरिकांच्या भावना सरकारपर्यंत पोचवण्यासाठी शब्द दिला. नदीकाठी असणारी देवराई, पाण्याचे झरे पाहिले तसेच झाडांना मिठी मारून चिपको आंदोलनात सहभाग घेतला झाडे वाचवण्याचा संदेश दिला. यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध पर्यावरण संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
आपण झाडांना वाचवतोय म्हणजे आपण हवेला वाचवतोय, श्वासांना वाचवतोय,नदीला वाचवतोय, पाण्याला वाचवतोय. श्वास व पाण्यापेक्षा आणखीन किमती काहीच नाही. सरकार सुद्धा नागरिकांच्या पसंती नुसार आपल्या धोरणांमध्ये बदल करेल अशी आशा आहे. - सोनम वांगचंग लडाख , पर्यावरण चळवळ कार्यकर्ते