शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका महिला अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:12 IST

तक्रारी नंतर देखील संबंधित पदाधिकारी कार्यालयात येऊन त्रास देत असल्याने महिलेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे

पुणे : भारतीय जनता पक्षाचा (भाजप) एक पदाधिकारी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत असल्याची तक्रार महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाकडे केली आहे. यापूर्वीही या पदाधिकाऱ्याची सुरक्षा विभागाने पोलिसात तक्रार केली आहे. भाजपच्या नेत्यांकडेही तक्रार केली आहे. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नाही. दरम्यान, महिला आयोगाने या तक्रारीची दखल घेतली असून महापालिकेकडून माहिती घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या एका आघाडीचा शहराध्यक्ष सोबत दहा ते पंधरा कार्यकर्ते सोबत घेवून महापालिका भवनात येतो. अनेकवेळा महापालिकेच्या प्रवेशद्वारापासूनच हे लोक घोषणाबाजी करत व गोंधळ घालत आतमध्ये येताना दिसतात.

याबाबत संबंधित महिलेने जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. काम करताना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली होती. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडेदेखील तक्रार दिली होती.
या तक्रारीवर समितीसमोर सुनावणी झाली. मात्र, पुढे नक्की काय कारवाई झाली, हे समितीकडून कळविण्यात आले नाही, अशी तक्रार या महिला अधिकाऱ्याने केली. तक्रारी नंतर देखील संबंधित पदाधिकारी कार्यालयात येऊन त्रास देत असल्याने महिलेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात महापालिकेला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून तसेच महापालिकेतील इतरांकडून माहिती देखील घेतली आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.

आरोग्य विभागातील दोन महिला अधिकाऱ्यांची तक्रार समितीकडे आली होती. त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठवून समितीने आवश्यक त्या शिफारशी केल्या आहेत.- डॉ. कल्पना बळीवंत अध्यक्ष, अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेRupali Chakankarरुपाली चाकणकरWomenमहिलाstate women commissionमहाराष्ट्र राज्य महिला आयोगPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका