शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थिनीची छेडछाड खटल्यातील शिक्षा झालेल्या आरोपीला जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शालेय विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शालेय विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

अमोल अशोक निकम (वय २५, रा. शंकरराव जाधवनगर, येरवडा) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी ४ वर्षे सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

शिक्षा ठोठावल्यापासून अमोल निकम हा येरवडा कारागृहात २७ जानेवारी २०२१ पासून शिक्षा भोगत होता. आरोपीने सत्र न्यायालयाच्या शिक्षेच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. प्राजक्ता मिलिंद पवार व अ‍ॅड. ऋषिकेश केशव करवंदे यांच्या वतीने अपील दाखल करून दाद मागितली होती. अपील दाखल करून द्यावे व अपिलाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला जामिनावर सोडण्याची विनंती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी ही विनंती मान्य करून आरोपीला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कारागृहातून सोडण्याचा आदेश व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या सुनावणीत दिले व आरोपीचे अपील दाखल करुन घेतले.

पीडित विद्यार्थिनी विश्रांतवाडी येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. आरोपी निकम हा पीडित मुलीला शाळेत जाताना, क्लासला जाताना पाठलाग करायचा. ९ जुलै २०१७ रोजी अमोल याने पीडित मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केला. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. सत्र न्यायालयात आरोपीने केलेला गुन्हा सरकार पक्षाने सिद्ध केल्याने त्याला ४ वर्षे कारावासाची व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

अ‍ॅड. प्राजक्ता पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, आरोपी शिक्षा होईपर्यंत जामिनावर होता़ खटल्याची सुनावणी सुरू असताना आरोपीच्या हातून कोणतेही गैरकृत्य घडलेले नाही़ त्याने जामिनाच्या सर्व अटी-शर्तींचे पालन केले आहे़ या अपिलाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला जामिनावर मुक्त केल्यास आरोपी सर्व अटी-शर्तींचे पालन करील, असा युक्तिवाद अ‍ॅड. प्राजक्ता पवार यांनी केला़ हा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.