शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या गावांत निवडणुकांचे आखाडे

By admin | Updated: July 14, 2015 00:05 IST

पावसाने ओढ दिल्याने ऐन पावसाळ्यातच जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांच्या गावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगले तापले आहे.

- सुषमा नेहरकर -शिंदे, पुणेपावसाने ओढ दिल्याने ऐन पावसाळ्यातच जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांच्या गावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगले तापले आहे. आपल्या गावाची सत्ता राखण्यासाठी या नेत्यांनी कंबर कसली असून, अनेकांनी गावातच ठिय्या मांडला आहे. यामध्ये जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे पदाधिकारी, सदस्य यांच्या गावात या निवडणुकीचे आखाडे रंगणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाने आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने अस्तित्वात आलेल्या सुमारे ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीसाठी सोमवार (दि.१३) पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यातच पावसाने मोठी ओढ दिली आहे. असे असले तरी निवडणुकीला सुरुवात झाल्याने गावागावांमधील वातावरण चांगलेच तापू लागले आहे़ त्यात वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे परिणाम गावपातळीपर्यंत होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे किमान आपल्या गावाची सत्ता राखण्यासाठी सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. गावातील गटातटांचे, भावकीचे राजकारण, त्यात आता वरिष्ठ नेत्याने गावात लक्ष घातल्याने अनेक गावांतील निवडणुका चुरशीच्या ठरणार आहेत. नेत्यांनी गावाच्या निवडणुकीत लक्ष घातल्याने गावच्या पारावर निवडणुकीच्या गप्पा चांगल्या रंगल्या आहेत. तर काही नेते गावच्या राजकारणापासून दहा कोस लांब राहणेच पसंत करतात.अर्ज दाखल करण्यास प्रारंभ-ग्रामपंचायत निवडणुकांचे अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून, सोमवारी (दि. २०) हा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, दोन सुट्ट्या आल्याने फक्त ६ दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहत आहेत. -पहिल्या दिवशी सोमवारी (दि. १३) बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथील उमेदवार विलास होळकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे. ५० ‘आॅनलाईन’ अर्ज भरण्यात आले आहेत. तर,१९५ अर्जांची विक्री करण्यात आली, तर दौंडमध्ये २ अर्ज दाखल झाले आहेत़ -जिल्ह्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राज्यमंत्री विजय शिवतारे (हरगुडे), खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (लांडेवाडी), आमदार दत्तात्रय भरणे (भरणेवाडी), माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात ( खुटबाव), जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मंगलदास बादल (शिक्रापूर), कृषी सभापती सारिका इंगळे (वाळुंज), महिला व बालकल्याण सभापती वंदना धुमाळ (पसुरे), आंबेगाव पंचायत समिती सभापती जयश्री डोके (खडकवाडी), खेड पंचायत समिती सभापती सुरेश शिंदे (आंबोली), बारामती सभापती संभाजीराव खलाटे (कांबळेश्वर), उपसभापती दत्तू लोंढे (देऊळगाव रसाळ), माजी सभापती रणजित शिवतरे (उत्रोली), मनीषा लव्हे (गोपाळवाडी), जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे (मांजरवाडी), मनीषा कोरेकर (न्हावरा)़