Video: मित्राला वाचण्यासाठी पाण्यात उडी मारलेला तरुण गेला वाहून; पुण्याच्या आकुर्डीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 21:39 IST2022-08-25T21:33:55+5:302022-08-25T21:39:14+5:30

आकुर्डी येथील महाविद्यालयाचे काही विद्यार्थी कुंड माळा येथे फीरायला गेले होते

A young man who jumped into the water to save his friend was carried away Events in Akurdi, Pune | Video: मित्राला वाचण्यासाठी पाण्यात उडी मारलेला तरुण गेला वाहून; पुण्याच्या आकुर्डीतील घटना

Video: मित्राला वाचण्यासाठी पाण्यात उडी मारलेला तरुण गेला वाहून; पुण्याच्या आकुर्डीतील घटना

पुणे: पुण्यातील आकुर्डी भागात काही महाविद्यालयीन विद्यार्थी फिरायला गेले असता मित्राला वाचण्यासाठी पाण्यात उडी मारलेला तरुण गेला वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजकुमार जयस्वाल असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अफराज शेख हा या घटनेत वाचला आहे. 

सविस्तर माहिती अशी कि,  आकुर्डी येथील महाविद्यालयाचे काही विद्यार्थी कुंड माळा येथे फीरायला गेले होते. त्यावेळी अफराज शेख या तरुणाचा पाय घसरून पाण्यात पडला. त्याला वाचवायला त्याचा मित्र राजकुमार जयस्वाल याने पाण्यात ऊडी मारली. पाय घसरून पडलेला अफराज शेख हा दगडाला धरुन उभा राहिला होता. पण वाचवायला गेलेला राजकुमार जयस्वाल हा मात्र वाहून गेला.  

त्याच वेळी बजरंग दल व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचेचे घटनास्थळी आले. त्यांना अफराज शेखला वाचवण्यात यश आले. राजकुमारला शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनच्या टीम काही वेळात पोहोचल्या.  त्यांचे व स्थानिक नागरिकांचे सायंकाळी सहा वाजे पर्यंत शोध कार्य सुरु होते. पण राजकुमारला शोधण्यात यश आले नाही. अंधार पडल्यामुळे शोध कार्य थांबवावे लागले. उद्या पुन्हा शोध कार्य चालु करु असे संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन चे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी सांगितले.

Web Title: A young man who jumped into the water to save his friend was carried away Events in Akurdi, Pune