शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

घाटात झोपणाऱ्या महिलेवर नराधमाची नजर, लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने खून, पुण्यातील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:13 IST

आरोपी एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत आहे. ज्या परिसरात तो काम करत होता, त्याच परिसरात ही महिला मागील काही दिवसांपासून फिरत होती

पुणे : दिवेघाट परिसरातच रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. हडपसर–सासवड रस्त्यावरील दिवेघाटाच्या पायथ्याशी ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ३ मार्च रोजी दिवेघाटाच्या पायथ्याशी एका अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फुरसुंगी पोलीस आणि गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. 

तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रकाश बिभीषण माने (वय २९, रा. वडकी नाला, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी प्रकाश माने हा एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत आहे. ज्या परिसरात तो काम करत होता, त्याच परिसरात ही महिला मागील काही दिवसांपासून फिरत होती. ती दिवेघाट परिसरातच रस्त्याच्या कडेला झोपत असे. तेव्हापासून आरोपीची तिच्यावर नजर होती.

रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपीने दिवेघाटाच्या पायथ्याशी त्या महिलेला गाठले. त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्याला विरोध करत आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे आपला भांडाफोड होईल या भीतीने आरोपीने संतापाच्या भरात तिच्या डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर गळा आवळून तिचा खून केला, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. मयत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले 

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट सहा चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, बाळासाहेब सकटे आणि त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Woman murdered for resisting sexual assault in Dive Ghat

Web Summary : In Pune, a woman sleeping near Dive Ghat was murdered after resisting sexual assault. Police arrested the accused, a supervisor, who confessed to the crime. The victim's identity is unknown.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूArrestअटकWomenमहिलाMolestationविनयभंग