पुणे : जुन्या भांडणाच्या कारणातून सहा ते सात जणांच्या टोळक्याने राडा घालत दहशत माजवल्याची घटना कोथरुडमधील श्रावणधारा सोसायटीत घडली. आरोपींनी एका तरुणाच्या घरात घुसून लोखंडी हत्यारांनी घरातील वस्तूंची तोडफोड करीत कुटुंबातील सदस्यांसह शेजाऱ्यांनाही बेदम मारहाण केली. याप्रकरणी कोथरूडपोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
तेजस कांबळे (वय २४), अजय महाजन (वय २२), निरज सातपुते (वय २०), नदिम शेख (वय १९), अभिजीत ओव्हाळ (वय ३०), सनी सानक्य (वय २०) आणि अभी घारे (वय २०) अशा गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, या आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत राहुल सुभाष गायकवाड (वय २२, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी राहुल गायकवाड हे घरी असताना आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्या घरावर हल्ला केला. आरोपी तेजस कांबळे याने लोखंडी हत्याराने राहुल यांच्या घराचा दरवाजा, गॅसची शेगडी, पाण्याचे हंडे आणि भिंतींवर मारून नुकसान केले. याच वेळी त्याच्या इतर साथीदारांनी खिडकीतून सिमेंटचा ब्लॉक फेकून मारला आणि राहुल यांच्या आई-वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. केवळ घरापुरतेच मर्यादित न राहता, आरोपींनी सोसायटीमध्ये दहशत माजवत अन्य दोघांनाही मारहाण करून जखमी केले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीि ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मारहाण तसेच आर्म ॲक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Web Summary : A gang of seven vandalized a house and assaulted residents in Kothrud following an old dispute. Police arrested all seven individuals after the violent incident caused widespread panic in the Shravandhara Society. The investigation is ongoing.
Web Summary : कोथरूड की श्रावणधारा सोसायटी में पुराने विवाद के चलते सात लोगों के गिरोह ने एक घर में तोड़फोड़ की और निवासियों पर हमला किया। पुलिस ने सभी सात आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। मामले की जांच जारी है।