रेंजहिल परिसरातील मेडिकल दुकानाला पहाटे भीषण आग, आग आटोक्यात अग्निशमन दलाला यश

By विवेक भुसे | Updated: January 18, 2024 10:57 IST2024-01-18T10:49:46+5:302024-01-18T10:57:07+5:30

अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करुन ही आग आटोक्यात आणली....

A fire broke out at a medical shop in Rangehill area early in the morning, the fire brigade was successful in extinguishing the fire | रेंजहिल परिसरातील मेडिकल दुकानाला पहाटे भीषण आग, आग आटोक्यात अग्निशमन दलाला यश

रेंजहिल परिसरातील मेडिकल दुकानाला पहाटे भीषण आग, आग आटोक्यात अग्निशमन दलाला यश

पुणे : रेंजहिल रोडवरील एका बंद मेडिकल दुकानाला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. दुकानातील वस्तू आगीत सापडल्यानंतर त्यातून स्फोटासारखे आवाज येत होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करुन ही आग आटोक्यात आणली.

रेंजहिल रोडवर मेडिक्युयर मेडिकल दुकान आहे. दुकान बंद असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे दिसले. अग्निशामक दलाला कळविले. पहाटे ४ वाजून १९ मिनिटांनी कॉल मिळताच अग्निशामक दलाच्या औंध, कसबा व एरंडवणे येथील ३ गाड्या व एक वॉटर टँकर तातडीने घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते.

अगदी दुकानाच्या शटरमधून बाहेर उंचावर आगीच्या ज्वाला दिसत होत्या. आग लागल्यानंतर आतील वस्तूंमधून छोट्या स्फोटासारखे आवाज येत होते. जवानांनी काही वेळ पाण्याचा मारा केल्यानंतर आग नियंत्रणात आली. त्यानंतर ठिकाण थंड करण्यासाठी जवळपास २ तास जवान प्रयत्न करत होते. या आगीत दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या़ आगीची शेजारील दोन दुकानांना झळ पोहचली आहे.

Web Title: A fire broke out at a medical shop in Rangehill area early in the morning, the fire brigade was successful in extinguishing the fire