पुण्यातील १४ वर्षीय मुलीला मध्यप्रदेशात ५० हजाराला विकले; पुणे पोलिसांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:31 IST2023-03-27T16:29:07+5:302023-03-27T16:31:48+5:30

अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले

A 14-year-old girl from Pune was sold to Madhya Pradesh for Rs 50,000 Pune police rescued | पुण्यातील १४ वर्षीय मुलीला मध्यप्रदेशात ५० हजाराला विकले; पुणे पोलिसांनी केली सुटका

पुण्यातील १४ वर्षीय मुलीला मध्यप्रदेशात ५० हजाराला विकले; पुणे पोलिसांनी केली सुटका

पुणे/किरण शिंदे : पुण्यातील १४ वर्षीय मुलीचा मध्य प्रदेश मध्ये ५० हजार रुपयात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या मुलीची पुणे पोलिसांनीमध्य प्रदेश मध्ये जाऊन सुटका केली असून याप्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शांती उर्फ सांतो हरनाम कुशवाह (४०) आणि धर्मेंद्र यादव (२२) असे या आरोपींची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीची मोठी बहीण पुण्यातील एका वर्कशॉप मध्ये काम करत होती. त्यावेळी या तरुणीची ओळख शांती शी झाली. शांती ने या तरुणीला तिच्या आवडीचा असलेल्या मुलाशी लग्न लावून देते असे खोटे आश्वासन देऊन तिला मध्य प्रदेश या ठिकाणी नेले. त्या ठिकाणी शांतीने या तरुणीचे जबरदस्तीने अवघ्या ५० हजार रुपयांसाठी धर्मेंद्र यादव या आरोपीशी लग्न लावून दिले. दरम्यान, यादव ने शांतीला करण्यासाठी एक मुलगी शोध आणि पैसे घे असे सांगितल्याने हा सगळा प्रकार शांतीने केला. पोलिसांनी या तरुणीचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश गाठले आणि आरोपींना अटक केली. 

Web Title: A 14-year-old girl from Pune was sold to Madhya Pradesh for Rs 50,000 Pune police rescued