शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खेड बाजार समितीसाठी ९९ टक्के मतदान

By admin | Updated: September 14, 2015 04:34 IST

खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात ९९.५० टक्के तर ग्रामपंचायत मतदारसंघात ९९.११ टक्के एवढे मतदान झाले

राजगुरुनगर : खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात ९९.५० टक्के तर ग्रामपंचायत मतदारसंघात ९९.११ टक्के एवढे मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली. अतिशय चुरशीची निवडणूक झाल्याने उद्या (१४ सप्टेंबर) निकालाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. सोसायटी मतदारसंघात १,२२३ पैकी १,२१७ मतदारांनी मतदान केले आणि ग्रामपंचायत मतदारसंघात १,२४३ पैकी १,२३२ मतदारांनी मतदान केले. व्यापारी आडते मतदारसंघात ९७.७४ टक्के, हमाल मापाडी मतदारसंघात ९८.५२ टक्के मतदान केले. राजगुरुनगर, चाकण, आळंदी, डेहणे, वाडा, कडूस, कुडा, पाईट, आंबोली, करंजविहिरे, वाफगाव, कनेरसर, शेलपिंपळगाव या गावांमध्ये एकूण २९ केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. अनेक केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. चुरशीमुळे बहुतेक मतदान केंद्रांवर दुपारी २ पर्यंतच ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. राजगुरुनगर आणि चाकण मतदान केंद्रांवर जास्त मतदान होत. म्हणून बहुतेक उमेदवार या केंद्रावर समर्थकांसह उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. एकही मतदार मतदानाशिवाय राहू नये, याची खबरदारी सर्व तीनही पॅनेलचे उमेदवार घेत होते.या निवडणुकीत आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास सहकारी पॅनल’ आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ‘भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनल’ हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही पॅनलकडे तगडे उमेदवार असल्याने जबरदस्त लढत आहे. सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारण गटात तर अटीतटीची लढत आहेच, पण ग्रामपंचायत मतदारसंघात या वेळी सर्वच तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे निवडणुकीचा कल वर्तविणे अवघड झाले होते. या दोन्हीही पॅनलने डावललेल्या असंतुष्टांनी ‘संत ज्ञानेश्वर शेतकरी सहकारी पॅनल’ करून निवडणुकीत रंगत आणली आहे. सर्व पॅनेलकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि दागिन्यांचे वाटप झाल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय झाली होती. तसेच शेवटच्या टप्प्यात पॅनेल सोडून उमेदवारांनी वैयक्तिक प्रचार सुरु केल्याने नेमका अंदाज वर्तविणे अवघड झाले आहे. (वार्ताहर)