महापालिकेतील ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Updated: June 4, 2015 05:30 IST2015-06-04T05:30:55+5:302015-06-04T05:30:55+5:30

महापालिका प्रशासकीय खात्यांतर्गत एकूण ९७ पदांवरील बदल्या करण्यात आलेल्या आहेत. काही विभागात वर्षानुवर्षे त्याच पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या

9 7 employees shift in municipal corporation | महापालिकेतील ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

महापालिकेतील ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी : महापालिका प्रशासकीय खात्यांतर्गत एकूण ९७ पदांवरील बदल्या करण्यात आलेल्या आहेत. काही विभागात वर्षानुवर्षे त्याच पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. स्थापत्य, आरोग्य, विद्युत, भांडार विभागातील पदावरील बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी प्रशासनाच्या वतीने एप्रिल व मे महिन्यात बदल्या होणार असे सांगण्यात आले होते. येत्या २ ते ३ दिवसांत दिलेल्या पदांवरील जबाबदारीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्ग रुजू होणार आहे.
स्थापत्य विभातील प्रथम वर्गातील कार्यकारी अभियंता पदावरील ३ अधिकारी, द्वितीय श्रेणीच्या स्थापत्य उपअभियंता पदावरील ३० अधिकारी, विद्युत विभागातील उपअभियंता विभागातील पदावरील २, सहायक आरोग्य अधिकारी ३, तृतीय श्रेणीतील आरेखक २ , अनुरेखक ३, सर्व्हेअर ३, लघुलेखक २, आॅपरेटर ३, वीजपर्यवेक्षक ३ , कनिष्ठ अभियंता विद्युत ३, मुख्य आरोग्य निरीक्षक १, आरोग्य निरीक्षक ४, वायरलेस आॅपरेटर ९, उपलेखापाल ४, सहायक भांडारपाल २, भांडारपाल ४, कार्यालयीन अधीक्षक १०, वीजतंत्री ३, चतुर्थ श्रेणीमधील वॉर्ड बॉय ३ यांच्या बदल्या केल्या आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: 9 7 employees shift in municipal corporation