शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्सचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 10:11 AM

नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाल्यामुळे नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाल्यामुळे नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्स विसर्ग.कऱ्हा नदीच्या लगतची सर्व गावे व बारामती शहरात नदीलगत सर्व ठिकाणी रेड अलर्ट.मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने संपूर्ण नाझरे गावातील नदीकाठच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

बाळासाहेब काळे, पुरंदर

जेजुरी - नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाल्यामुळे नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे कऱ्हा नदीच्या लगतची सर्व गावे व बारामती शहरात नदीलगत सर्व ठिकाणी रेड अलर्ट देण्यात येत आहे . सर्व नागरिकांनी व प्रशासकीय यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहावे. तरी सर्व प्रशासकीय यंत्रणाना याद्वारे रेड अलर्ट देण्यात येत आहे.

मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने संपूर्ण नाझरे गावातील नदीकाठच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.  नाझरे जलाशयातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. जलाशयातील विसर्ग आता कमी करण्यात आला आहे. धरणाची साठवण क्षमता आणि नदी पात्रातून येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरण फुटू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने अशी अनुचित घटना घडली नाही.

पुरंदर तालुक्यामध्ये मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा फटका बारामती तालुक्याला बसला. पुरंधर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीला 50 वर्षात प्रथमच महापूर आला आहे. पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या अनेक कुटुंबांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. तसेच हजारो विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत. तालुक्यातील 15 हजार, बारामतीच्या 7 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

कऱ्हा नदीकाठी असणाऱ्या आंबी बु, आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली, माळवाडी, बाबुर्डी,  जळगावकडे पठार, जळगाव सुपे आदी गावांमधील नदीकाठच्या नागरीकांना हलविण्यात आले आहे. पुरंदरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दीड वाजता पाण्याचा मोठा विसर्ग नाझरे धरणातून सुरू करण्यात आला. तत्पूर्वी प्रशासनाने रिक्षातून भोंगा लावून पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील यांनी नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या. रात्रीपासूनच मोरगावच्या मुख्य चौकातून सुपेकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. नदीकाठची घरे पाण्याखाली गेली आहेत. अनेक नागरिकांनी स्वतः हून स्थलांतर केले.

 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीJejuriजेजुरीDamधरणRainपाऊस