पुरंदरमध्ये ८१ मिलिमीटर दमदार पावसाची नोंद

By Admin | Updated: June 23, 2015 03:21 IST2015-06-23T03:21:43+5:302015-06-23T03:21:43+5:30

पुरंदर तालुक्यात गेले दोन दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाली असून आजअखेर ८१ मिलिमीटर पाऊस झाला आहे

81 mm of heavy rain in Purandar | पुरंदरमध्ये ८१ मिलिमीटर दमदार पावसाची नोंद

पुरंदरमध्ये ८१ मिलिमीटर दमदार पावसाची नोंद

जेजुरी/नीरा : पुरंदर तालुक्यात गेले दोन दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाली असून आजअखेर ८१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पुरंदर तालुक्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी ९० मि.मी.ची असून जूनच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. आजही संपूर्ण दिवसभर अशाच प्रकारचा पाऊस राहिल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. तरी ही एखाद्या मोठ्या पावसाची अपेक्षा आहेच. ओढे-नाले भरून वाहिल्यास पुढील वर्षभराची काळजी मिटते. अशी पुरंदरची वस्तुस्थिती आहे.
जून महिना सुरू झाल्यानंतर पुरंदरचा शेतकरीवर्ग पावसाच्या अपेक्षेत होता, अपेक्षेप्रमाणे थोडा उशिरा का होईना, पण पावसाला सुरुवात झाली असून काल एका दिवसात तालुक्यातील सर्वच पर्जन्यमापक केंद्रावर पावसाने हजेरी लावली. कालच्या एका दिवसाची सरासरी ३० मि.मी.पेक्षा जास्त होती. पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात पावसाला जोर असून पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमीच आहे.

Web Title: 81 mm of heavy rain in Purandar