शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘घोडगंगा’साठी ८0.८३ टक्के मतदान

By admin | Updated: May 11, 2015 06:04 IST

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी आज ८0.८३ टक्के मतदान झाले.

शिरूर : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी आज ८0.८३ टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत ४५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे बहुतांशी मतदान केंद्रांवरचे चित्र होते. उन्हाचा तडाखा कमी झाल्यावर पुन्हा मतदानास वेग आला. दोन्ही पॅनेलने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीचा निकाल १२ मे रोजी लागणार आहे.आज सकाळी तालुक्यातील ६० मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. एकूण १९ हजार १४३ मतदारांपैकी १९६३ मतदार मयत असून, १७ हजार १८० मतदारांना मतदान करावयाचे असल्याने बूथवर फारसा ताण नव्हता. मात्र मतदान केंद्राबाहेर दोन्ही पॅनेलचे बूथ होते. उन्हापासून संरक्षणासाठी मांडव उभारण्यात आले होते. उन्हाचा तडाखा वाढण्याआधी म्हणजे ११ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले. यानंतरही तीन वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर तुरळक मतदार दिसून आले. तोपर्यंत ४५ ते ५० टक्के मतदान झाले होते. चारनंतर पुन्हा मतदारांच्या रांगा दिसून आल्या. वेळ सहापर्यंत असल्याने मतदानाचा टक्का ८0.८३ पर्यंत गेला.दरम्यान, सहकार बचाव, शेतकरी पॅनेलचे प्रमुख आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दुपारी शिरुर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख, माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी वडगाव साराई येथील मतदान केंद्रात सकाळी मतदान केले. या पॅनेलचे आधारस्तंभ माजी आमदार पोपटराव गावडे यांनी टाकळी-हाजी मतदान केंद्रावर मतदान केले. गेले आठवडाभर कोणता पॅनेल बाजी मारेल या चर्चेला उधाण आले आहे. पवार यांच्या अस्तित्वाची लढाई असून, विधानसभेच्या पराभवानंतरही निवडणूक जिंकण्यासाठी जिवाचे रान केल्याचे दिसून आले आहे. पाचर्णे यांनी कारखाना ताब्यात घ्यायचाच, असा निर्धार करून प्रचारादरम्यान आपला झंझावात दाखवून दिला आहे. यामुळे आज मतदानाच्या दिवशीही दोघे मतदान केंद्रावर आढावा घेताना दिसून आले. आमदार पाचर्णेंच्या पत्नी मालती पाचर्णे व माजी आमदार पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यादेखील मतदान केंद्रावर ठाण मांडून बसल्याचे दिसून आले.कोणत्याही मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण दिसून आले नाही. काही मतदान केंद्रांवर खेळीमेळीचे वातावरणही पाहावयास मिळाले.