शेतजमिनीच्या वादातून ७५ वर्षीय शेतकऱ्याला गंभीर मारहाण; उपचारदरम्यान मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:36 IST2026-03-04T17:36:04+5:302026-03-04T17:36:41+5:30

तुम्ही या शेतात यायचे नाही असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून दाम्पत्याला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली

75-year-old farmer severely beaten over agricultural land dispute; dies during treatment, incident in Khed taluka | शेतजमिनीच्या वादातून ७५ वर्षीय शेतकऱ्याला गंभीर मारहाण; उपचारदरम्यान मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

शेतजमिनीच्या वादातून ७५ वर्षीय शेतकऱ्याला गंभीर मारहाण; उपचारदरम्यान मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

राजगुरूनगर : ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे शेतजमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याला गंभीर मारहाण केल्याने केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना दि ३ रोजी घडली आहे. सोपान तुकाराम भांबुरे (वय ७५ रा ढोरे भांबुरवाडी, ता. खेड ) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून याबाबत खेड पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

खेळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढोरे भांबुरवाडी येथे मयत सोपान भांबुरे यांच्या शेतात गहू मळणीचे काम सुरू होते. मुलगा रामदास भांबुरे हा शेतातून घरी धान्य घेऊन गेला होता. दरम्यान दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास मयत यांच्या भावकीतील शिवाजी पांडुरंग भांबुरे, किरण शिवाजी भांबुरे, आशा सुभाष भांबुरे, सोनाली किरण भाबुरे, अरूणा शिवाजी भांबुरे सर्व (रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड ) यांनी तुम्ही या शेतात यायचे नाही असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून सोपान भांबुरे व पत्नी चंद्रकला भांबुरे यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी सोपान भांबुरे खाली पडले असता सर्वांनी त्यांना छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या भांडणामध्ये सोपान भांबुरे यांना चक्कर आल्याने त्यांना राजगुरूनगर येथे उपचारकामी खासगी रुग्णालयात दाखल केले असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे. 

Web Title : भूमि विवाद: खेड़ में 75 वर्षीय किसान की मारपीट के बाद मौत

Web Summary : खेड़ के खांबुरवाड़ी में भूमि विवाद में 75 वर्षीय किसान की पिटाई से मौत हो गई। गेहूं की मड़ाई के दौरान पीड़ित के खेत पर हुए हमले के संबंध में पांच लोगों पर आरोप लगाए गए हैं। किसान ने हमले में लगी चोटों के कारण दम तोड़ दिया।

Web Title : Land dispute: 75-year-old farmer dies after assault in Khed.

Web Summary : A 75-year-old farmer from Khamburwadi, Khed, died after being beaten due to a land dispute. Five individuals have been charged in connection with the assault, which occurred during wheat threshing at the victim's farm. The farmer succumbed to injuries sustained during the attack.