शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

पाहा Video : साडी नेसलेल्या या ७० वर्षीय आजीचं नृत्यकौशल्य पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 5:34 PM

या दोन्ही व्हीडियोंमध्ये आपलं नृत्य सादर करणाऱ्या साडी नेसलेल्या ७० वर्षीय आजी आपल्याला तुमच्या आमच्या आजीची आठवण करुन देतील.

ठळक मुद्देही व्हिडीयो सध्या अनेक लोकांच्या फेसबूक टाईमलाईनवर दिसत आहे तसेच व्हॉटेसअॅपवरही व्हायरल आहे.साडी नेसलेली ही ७० वर्षीय आजी नाचु लागली की आपल्या तोंडातून फक्त 'व्वा' निघतंनृत्यात त्यांची ऊर्जाही लाजवाब आहे. तसंच त्यांनी याआधी सिनेमात काम केल्याचीही चर्चा आहे.

पुणे : कलेला कोणत्याही वयाची मर्यादा नसते. कोणत्याही वयात कला फुलू शकते. तसेच लहानपणापासून जपलेली कला वय झाल्यावरही अनेक जण जपतात. काहींना तरुणपणातच दिशा सापडते आणि त्यातच अनेकजण करिअर करतात. मात्र इतरांना दिशा न मिळाल्याने त्यांची कला ही त्यांच्यापुरती मर्यादित राहते. पण सध्या सोशल मीडियामुळे कोणाचीही कला लपू शकत नाही. मग नृत्याची बिजली संचारलेल्या आजीबाई तरी कशा मागे राहतील? सध्या फेसबुकवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. एक आजीबाई आपल्या नृत्यामुळे सगळ्या नेटिझन्सना भुरळ घालत आहेत.

व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या या आजींना पाहता असा अंदाज बांधता येईल की त्यांच वय ७० च्या घरात असेल. पण त्यांनी एका गाण्यावर ज्याप्रमाणे ठेका धरला आहे त्यावरून सगळेच अवाक झालेत. हॉलिवूड आणि बॉलिवूड नृत्यांगनांनाही मागे टाकतील असचं या आजीबाईंचं नृत्य आहे. केवळ ठेकाच नाही, तर त्यांचे हावभाव, त्यांची ऊर्जा हे सारं थक्क करणारंच आहे. मिथून चक्रवर्थी यांच्या ‘परिवार’ या चित्रपटातलं हे गाणं आहे. या गाण्यावर त्यांची अदाकारी खरंच पाहण्यासारखी आहे. एका फेसबुक पेजने ६ डिसेंबर रोजी हा व्हिडिओ अपलोड केला होता. आता अनेकांच्या टाईमलाईनवर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तसंच, अनेक फेसबुकपेजने हा व्हिडिओ व्हायरलही केलाय. आतापर्यंत या व्हिडिओला ७ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

आणखी वाचा - वणव्यात अडकलेल्या सशाला वाचवण्यासाठी तरुणाचे प्रयत्न

आता या आजीविषयी तुम्हाला सांगूया. सुशिलाबाई दवळकर असं या आजींचं नाव आहे. त्या मुळच्या पुण्याच्या. हा त्यांचा एकच व्हिडिओ नसून याआधीही त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुण्यातल्या थ्रीडीटी डान्स अॅकॅडमीच्या स्नेहसंमेलनात त्यांनी ‘झिंगाट’वरही धम्माल केली होती. तो व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. असं सांगण्यात येतंय, की त्यांनी याआधी मराठी चित्रपटातही कामं केली आहेत. दरम्यान, हे दोन्ही व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाले तेव्हा नेटिझन्सने त्यांची चांगलीच प्रशंसा केली आहे. एखाद्या अव्वल नृत्यांगनांनाही लाजवेल अशी यांची अदाकारी आहे. त्यांनी त्यांची ही मेहनत अशी चालू ठेवून इतरांनाही प्रशिक्षण द्यावं असं काही नेटिझन्सने सांगितलं आहे. या आजीबाईंची ही कला अशीच दिवसेंदिवस वृद्धिंगत होण्यासाठी अनेकांनी कॉमेन्ट्सद्वारे प्रार्थनाही केली. तसंच, या एनर्जीच्या जोरावरच त्यांना सुदृढ दिर्घायुष्य मिळावं म्हणूनही नेटिझन्सने प्रार्थना केली आहे. 

इतर जरा हटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

टॅग्स :PuneपुणेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया