शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान इंदापूरात, ग्रामीण भागात उत्साह टिकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 19:15 IST

आंबेगाव, इंदापूर, खेड आळंदी, दौंड, बारामती, मावळ, या ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह टिकून राहिला

पुणे : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. शहरी भागात ११ वाजेपर्यंत मतदानाला उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. तर ग्रामीण भागात ११ नंतर मतदानाच्या गतीला वेग आला. सकाळापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुण्यातील ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह दिसून आला आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक ६४.५० टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी विधानसभा मतदार संघात सर्वात कमी ४२.७२ टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ५४.०९ टक्के मतदान झाले आहे. 

अपेक्षेनुसार ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह जाणवत असून शहरी भागात मात्र दुपारच्या वेळेत मतदान कमी झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात तीन वाजेपर्यंत ४१.७० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. सर्वाधिक मतदान मावळ मतदारसंघात ४९.७५ टक्के झाले होते. मावळसह जुन्नर, आंबेगाव, इंदापूर मध्येही ४९ टक्क्यांच्या वर मतदान झाल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. शहरात मात्र अपेक्षेनुसारच दुपारच्या वेळेत मतदान कमी झाले. अखेरच्या टप्प्यात शहरी भागात मतदान वाढण्याची शक्यता आहे. पिंपरी मतदारसंघात सकाळपासूनच कमी मतदानाची नोंद होत असून दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान ३१.५८ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत टक्केवारी 

आता मात्र इंदापूर मतदार संघाने आघाडी घेतली आहे. तर पिंपरी अजूनही कमीच मतदान झाले आहे. ग्रामीण भागात सकाळपासून मतदारांच्या रांगा नव्हत्या. मात्र, ११ नंतर रांगा दिसून आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश मतदारसंघात चांगले मतदान झाले आहे. तर शहरी मतदारसंघात सुरुवातीला रांगा होत्या. तर त्यानंतर मतदारांनी कार्यालये गाठल्याने मतदानाचा टक्का कमी झाला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४indapur-acइंदापूरbaramati-acबारामतीmaval-acमावळpimpri-acपिंपरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVotingमतदान