शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माहेरहून ५ लाख, सोन्याचे दागिने; पुण्यात पुन्हा हुंड्यासाठी छळ; महिलेने इमारतीतून उडी मारत संपवले जीवन

By नितीश गोवंडे | Updated: June 9, 2025 16:36 IST

विवाहानंतर काही महिन्यात पती सूरज, सासू सुनीता, दीर नीरज, मामे सासरे उपाध्याय यांनी हुंड्यात पैसे, तसेच दागिने कमी दिल्याचे सांगून तिचा छळ सुरू केला

पुणे : माहेरहून पाच लाख रुपये, तसेच हुंड्यात सोन्याचे दागिने आणावे म्हणून सासरकडील नातेवाईकांनी छळ केल्याने महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नगर रस्त्यावरील केसनंद भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सासू, दीर, तसेच मामे सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वाती सूरज पाठक (२०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सूरज राजेंद्रप्रसाद पाठक (२६, रा. ओम निवास, तळेरानवाडी रस्ता, केसनंद, नगर रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सासू सुनीता पाठक (४५), दीर नीरज पाठक (२३), मामे सासरे अरुण उपाध्याय, अरविंद उपाध्याय (सर्व रा. केसनंद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वातीच्या आईने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मूळची मध्य प्रदेशातील महू शहरातील आहेत. तिचा गेल्या वर्षी मार्च महिन्यात सूरज पाठक याच्याशी विवाह झाला होता. विवाहात स्वातीच्या कुटुंंबियांनी एक लाख रुपये हुंडा आणि सात तोळे सोन्याचे दागिने दिले होते. विवाहानंतर काही महिन्यात पती सूरज, सासू सुनीता, दीर नीरज, मामे सासरे उपाध्याय यांनी हुंड्यात पैसे, तसेच दागिने कमी दिल्याचे सांगून तिचा छळ सुरू केला. तिला टोमणे मारण्यात आले. आरोपींनी माहेरहून पाच लाख रुपये हुंडा आणि सोन्याचे दागिने घेऊन येण्याची मागणी केली. छळामुळे स्वातीने ६ जून रोजी राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हुंड्यासाठी मुलीचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद स्वातीच्या आईने नुकतीच दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक अहिरे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाMONEYपैसाjewelleryदागिनेDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी