शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
5
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
6
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
7
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
8
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
9
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
10
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
11
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
12
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
13
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
14
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
15
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
16
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
17
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
18
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
19
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
20
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...

आडत्याने थकविलेले कांदा उत्पादक शेतक-यांचे ४९ लाख अखेर वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 6:48 PM

गुलटेकडी मार्केटयार्डात काही आडत्यांकडून शेतक-यांचे शेतमालाच्या पट्टीचे पैसे थकविल्याच्या घटना घडतात.

ठळक मुद्देबाजार समितीची मध्यस्ती :  शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलाबाजार समितीकडे शेतक-यांनी एका आडत्याने कांदा विक्रीचे सुमारे ६४ लाख रुपये दिले नसल्याची तक्रार

पुणे :  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात कांदा उत्पादक ५२ शेतक-यांचे शेतमालाच्या पट्टीचे आडत्याने थकविलेली ४९ लाख रुपये बाजार समितीने वसूल करून दिले. विक्री केलेल्या कांद्याचे थकीत पैसे मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुलटेकडी मार्केटयार्डात काही आडत्यांकडून शेतक-यांचे शेतमालाच्या पट्टीचे पैसे थकविल्याच्या घटना घडतात. व्यापारातील चढ उतार आणि फसवणुकीमुळे आडत्यांनाही कधी-कधी शेतक-यांचे पैसे देण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र, शेतक-यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे देणे आडत्याला बंधनकारकच असते. मागील काही महिन्यात मार्केटयार्डातील मे.पिंपळे आणि कंपनी या गाळ्यावर ५२ कांदा उत्पादक शेतक-यांनी कांदा विक्री केला होता. मात्र, आडत्याकडून त्याचे पैसे शेतक-यांना देण्यात आले नव्हते. त्यामुळे संबंधित शेतक-यांनी बाजार समितीकडे लेखी तक्रार केली. बाजार समिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी यात लक्ष घालून संबंधित तक्रारींवर सुनावणी घेत शेतक-यांना त्यांच्या हक्काचे ४९ लाख ६२ हजार २२४ रुपये परत मिळवून दिले.    याबाबत पुणे जिल्ह्यातील पुरदंर तालुक्यातील बोपगाव येथील शेतकरी शामराव फडतरे म्हणाले, काही महिन्यांपुर्वी  मार्केटयार्डात सुमारे ५ ते ६ टन कांदा विक्री केली होती. त्याची पट्टी सुमारे ७१ हजार रूपयांची झाली. मात्र, वारंवार आडत्याला भेटूनदेखील त्यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतर समिती प्रशासनाने दखल घेत पैसे मिळवून दिले.  --------------बाजार समितीकडे कांदा उत्पादक शेतक-यांनी एका आडत्याने कांदा विक्रीचे सुमारे ६४ लाख १३ हजार ९१० रुपये दिले नसल्याची तक्रार केली होती. त्यानुसार बाजार समितीने संबंधित आडत्याने किती पैसे दिले आणि किती बाकी आहेत, याची शहानिशा करून सर्व अर्जांवर सुनावणी घेतली. त्यानंतर सर्व शेतक-यांचे मिळून ४९ लाख ६२ हजार २२४ रुपये त्यांना मिळवून दिले. बाजार समिती शेतक-यांच्या हितासाठीच कार्यरत आहे. पुणे बाजार समितीत शेतक-यांची फसवणुक अथवा पैसे थकविल्यास तत्काळ कार्यवाही करून शेतक-यांना न्याय देण्याचे काम केले जाते. बी.जे.देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे.

टॅग्स :PuneपुणेonionकांदाMarket Yardमार्केट यार्ड