पुणे : पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन-३) या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला येरवडा येथील ४८ हजार ६०० चौरस मीटर शासकीय जमीन कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही जमीन मेट्रो प्रकल्पासाठी लागणारा व्यवहार्यता तफावत निधी उभारण्यासाठी वापरली जाणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. येरवडा येथील विविध सिटी सर्व्हे क्रमांकांमधील एकूण ४८ हजार ६०० चौरस मीटर जमीन पीएमआरडीएला देण्यात आली आहे. यामध्ये सिटी सर्व्हे २२०१ मधील १४ हजार ८८० चौरस मीटर सिटी सर्व्हे २२१६ मधील १५ हजार ६६० चौरस मीटर आणि सिटी सर्व्हे २२२० मधील १५ हजार ९५४ चौरस मीटर क्षेत्राचा समावेश आहे. ही जमीन भांबुर्डा येथील १० हे. ६० आर जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून हस्तांतरित करण्यात आली आहे.
यासाठी शासनाने काही अटी घातल्या असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ आणि नियम १९७१ नुसार, ही जमीन मोफत आणि कायमस्वरूपी कब्जेहक्काने देण्यात आली आहे. पीएमआरडीएने ही जमीन भोगवटादार वर्ग-२ म्हणून धारण करावी. जमिनीच्या व्यावसायिक विकासातून मिळणारे उत्पन्न शासनाच्या व्यवहार्यता तफावत निधीसाठी वापरले जाईल.
सिटी सर्व्हे २२२० वरील शिक्षण संकुलाचे आरक्षण नगर विकास विभागाने लवकर बदलावे. जमिनीचा वापर केवळ मेट्रो प्रकल्पासाठीच करणे बंधनकारक आहे. अटींचा भंग झाल्यास जमीन शासन जमा करू शकते. पुणे जिल्हाधिकारी यांना जमीन हस्तांतरणापूर्वी पीएमआरडीएकडून लेखी हमीपत्र घ्यावे लागेल.
Web Summary : 48,600 sq. meters of Yerwada land transferred to PMRDA for Pune Metro Line-3. Revenue will fund viability gap for the project, boosting connectivity.
Web Summary : पुणे मेट्रो लाइन-3 के लिए पीएमआरडीए को येरवदा की 48,600 वर्ग मीटर जमीन हस्तांतरित। राजस्व परियोजना के लिए व्यवहार्यता अंतर को निधि देगा, कनेक्टिविटी को बढ़ावा देगा।