शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नळजोड न देताच आले ४८ हजार रुपयांचे बिल

By admin | Updated: February 16, 2015 04:39 IST

कोथरूड येथील रामबाग कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाला नळजोड न देताच पालिका प्रशासनाने पाणीपट्टीचे ४८ हजार रुपयांचे बिल पाठविले आहे.

पुणे : कोथरूड येथील रामबाग कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाला नळजोड न देताच पालिका प्रशासनाने पाणीपट्टीचे ४८ हजार रुपयांचे बिल पाठविले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या ही बाब निर्दशनास आणून देऊनही प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही. आॅर्चिड सोसायटीत राहणारे दीनदयाळ वर्मा यांच्या पाण्याचे कनेक्शन सोसायटीने सोडले. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे स्वतंत्र नळजोड कनेक्शनसाठी २६ मार्च २०१३ रोजी अर्ज केला. त्यानंतर पालिकेकडे रीतसर २ हजार ८३० रुपये अनामत रक्कम भरली. त्यांना नळजोड मंजूर झाल्यानंतर ते बसविण्याकरिता आवश्यक असलेले ८ ते १० हजार रुपयांचे साहित्य खरेदी केले.महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी त्यांना नळजोड कनेक्शन देण्यासाठी सोसायटीमध्ये आले असता त्यांना स्वतंत्र नळजोड देण्यास सोसायटीचे पदाधिकारी व रहिवाशांनी विरोध केला. त्यामुळे वर्मा यांच्या घरी नळजोड न बसविताच पालिकेचे कर्मचारी परत गेले. सोसायटीच्या संमतीशिवाय वर्मा यांना नळजोड देता येणार नसल्याचे वर्मा यांना सांगण्यात आले. त्यामुळे नळजोड कनेक्शनसाठी भरलेली अनामत रक्कम परत मिळावी, म्हणून वर्मा यांनी मागणी केली. मात्र, त्यांना पालिकेकडून अनामत रक्कम देण्यात आली नाही.दीड वर्षांनी ६ फेब्रुवारी २०१५ रोजी महापालिकेकडून ४८ हजार रुपयांचे पाणीवापराचे बिल पाठविले. महापालिकेकडून बिल पाठविण्यात आल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली. मात्र, पहिल्यांदा बिल भरा मग पाहू, अशी उत्तरे त्यांना देण्यात आल्याचे वर्मा यांनी सांगितले.