शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप मतदारयादीमध्ये झाल्या ४६० दुरूस्त्या

By admin | Updated: January 23, 2017 03:25 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर एकूण ९०९ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या,

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर एकूण ९०९ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या, त्याची पडताळणी केल्यानंतर ४६० हरकतींचा योग्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार योग्य त्या दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत.महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी रविवारी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली. प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आली होती. या प्रारूप रचनेवर ९०९ हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये धनकवडी क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये सर्वाधिक ३०७ इतक्या मतदारांच्या अदला-बदली झाल्याच्या हरकती आल्या होत्या. तर सर्वात कमी २२ हरकती घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभागामध्ये आल्या आहेत. या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रभागरचनेप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्या बनवितानाही राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला होती. प्रशासनाकडे आलेल्या हरकतींची पडताळणी केल्यानंतर ४६० तक्रारी योग्य असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित हरकतींपैकी काही तक्रारी हदद्ीबाहेरच्या नागरिकांच्या होत्या. काही तक्रारी या दुबार आल्या होत्या. त्यानुसार त्यामध्ये योग्य ते बदल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलर्णी यांनी दिली. निवडणूक कार्यालयनिहाय प्रभागनिहाय आलेल्या हरकतींची आकडेवारी पुढीलप्रमाणे होती. औंध ३१, घोले रोड २२, कोथरूड १०५, वारजे-कर्वेनगर ४९, ढोलेपाटील रस्ता २७, येरवडा १३, वडगावंव शेरी ५२, भवानी पेठ २४, कसबा-विश्रामबागवाडा ३६, टिळकरोड ५२, सहकारनगर ३३, बिबवेवाडी ५१, धनकवडी ३०७, कोंढवा-वानवडी ३०७, हडपसर ४० हरकती नोंदविण्यात आली आहे. स्वारगेट येथील नाईक बि बियाणे केंद्र, सेवा मित्र मंडळ चा भाग हा प्रभाग क्रमांक १५ मध्ये येत असताना तो प्रभाग १८ मध्ये दाखविण्यात आला. त्याचबरोबर सोन्या मारूती परिसरातील काही भाग प्रभाग १७ मध्ये येत असताना प्रभाग १८ मध्ये समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. येरवडयाच्या व्हाइट हाऊस सोसायटीचा परिसर तसेच रामवाडीचा काही भाग प्रभाग ५ मध्ये येत नसतानाही तो जोडण्यात आल्याचीही तक्रार करण्यात आली होती. प्रभागनिहाय याद्या करताना प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली गेली नसल्याचा सुर या तक्रारींमधून उमटला होता.