शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

Pune Population: २०११ मध्ये ४५ लाख; आता तब्बल ८० लाखाचा अंदाज, १५ वर्षांत पुणे जिल्ह्याची लोकसंख्या दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:32 IST

जिल्ह्याची लोकसंख्या २०११ मध्ये अंदाजे ४५ लाख इतकी होती, त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत या लोकसंख्येत जवळपास दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे

पुणे: पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेपूर्वी स्वगणना व घरगट यादी या उपक्रमातून पुणे व पिंपरी महापालिका वगळता जिल्ह्याची लोकसंख्या ८० लाख इतकी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २०११ मध्ये अंदाजे ४५ लाख इतकी होती. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत या लोकसंख्येत जवळपास दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही आकडेवारी अद्याप अधिकृत नसली तरी जनगणनेसाठी तयार केलेल्या परिमंडळाच्या संख्येवरून निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेची सुरुवात १ ते १५ मे यादरम्यान नागरिकांच्या स्वगणनेद्वारे होत आहे. त्यानंतर १६ मे ते १५ जून या काळात प्रगणक घरोघरी जाऊन घरगट यादी तयार करणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने ६ प्रगणकांच्या गटासाठी एक पर्यवेक्षक नेमला आहे. प्रगणक व पर्यवेक्षकांची एकूण संख्या सुमारे १२ हजार इतकी निश्चित केली आहे. त्यांना घरगट यादी निश्चित करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण आठ मे रोजी पूर्ण होणार आहे.दरम्यान, नागरिकांना स्वगणना करताना मोबाइलच्या माध्यमातून संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरता येणार आहे, त्यासाठी ३३ प्रकारची माहिती भरावी लागणार असून, नागरिकांनी भरलेली माहिती प्रगणक तपासून पाहतील आणि त्यानंतर मोबाइल ॲपच्या माध्यमातून संकेतस्थळावर भरतील. त्यामुळे प्रगणकांचे काम हलके होऊन वेळही वाचणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वगणना करताना खरी माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्ह्यात १६ मे ते १५ जून यादरम्यान घरगट यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रगणकाकडे ८०० नागरिकांचा एक समूह अर्थात परिमंडळ देण्यात आले आहे. प्रगणक प्रत्येक घरात जाऊन त्या संदर्भातील माहिती गोळा करून घरगट तयार करणार आहे. प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार जिल्ह्यात एकूण १० हजार १७२ परिमंडळ तयार केले आहेत. हे परिमंडळ तयार करताना आशा सेविका, तसेच तलाठ्यांकडून आलेल्या माहितीचा आधार घेण्यात आला आहे. काही गावांमध्ये अनेक परिमंडळ तयार झाले असून छोट्या वाड्या आणि वस्त्यांवर मात्र, ८०० पेक्षा कमी लोकसंख्या असली तरीदेखील एक परिमंडळ तयार करण्यात आले आहे. मात्र, ही संख्या तुलनेने कमी आहे.

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यात सर्वाधिक १६७० परिमंडळ तयार झाले आहेत. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात शहरी, तर काही प्रमाणात डोंगरी भाग असल्याने परिमंडळांची संख्या अधिक असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. खेडपाठोपाठ हवेली तालुक्यात ११५०, शिरूर १०७९, मावळ १०३४, मुळशी ८१५, बारामती ८१०, जुन्नर ६७७, इंदापूर ६१३, दौंड ७४६, आंबेगाव ४४९, पुरंदर ४२२, भोर ४१०, राजगड १४७ परिमंडळ तयार करण्यात आली आहेत. तर पुणे खडकी व देहू कॅन्टोन्मेंटमध्ये १८६ परिमंडळ तयार करण्यात आली आहेत, यामध्ये सर्व नगरपरिषद यांचा देखील समावेश केला आहे.

एका परिमंडळात एकूण ८०० नागरिकांचा समूह असल्याने एकूण परिमंडळांची संख्या लक्षात घेता जिल्ह्याची लोकसंख्या ८० लाखांच्या घरात असल्याचे स्पष्ट होत आहे. तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतील परिमंडळांची संख्या लक्षात घेतल्यास जिल्ह्याची एकूण लोकसंख्या निश्चित होणार आहे. यापूर्वी २०११ मध्ये जनगणना झाली होती. त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ४५ लाख ७७ हजार इतकी होती. तर पुणे शहराची लोकसंख्या ३१ लाख २४ हजार व पिंपरी शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार होती. त्यामुळे नव्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची लोकसंख्या केवळ १५ वर्षांत जवळपास दुप्पट झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune's Population Doubles in 15 Years, Estimated at 80 Lakh

Web Summary : Pune district's population is estimated at 80 lakh, doubling in fifteen years since 2011's 45 lakh. The upcoming census utilizes self-enumeration and household listings. Citizens can submit data online, aiding enumerators. Khed has the most enumeration blocks.
टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSocialसामाजिकjobनोकरी