पुण्यात २४ तासांत ४४ मिमी पाऊस

By Admin | Updated: March 2, 2015 01:13 IST2015-03-02T01:13:08+5:302015-03-02T01:13:08+5:30

शहरासह उपनगरामध्ये काल अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. रात्रभर आणि आज दिवसभर सतत पाऊस सुरू होता.

44 mm rain in 24 hours in Pune | पुण्यात २४ तासांत ४४ मिमी पाऊस

पुण्यात २४ तासांत ४४ मिमी पाऊस

पुणे : शहरासह उपनगरामध्ये काल अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. रात्रभर आणि आज दिवसभर सतत पाऊस सुरू होता. गेल्या २४ तासात शहरात ४४.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. सलग पाऊस लागून राहिल्याने ऐन फेब्रुवारीत पुणेकरांना मॉन्सून आल्याचा फिल येत होता. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्यात गेले होते. . शनिवारी रात्रभर जोरात पाऊस पडत होता. पुणेकरांची आजची सकाळही पावसातच झाली. पावसाने उघडीपच न दिल्याने आज दुपारपर्यंत पुणेकरांना सुर्याचे दर्शन झालेच नाही.

Web Title: 44 mm rain in 24 hours in Pune