SSC Result 2025: बारामतीत ८१ पैकी ४० शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा ९७.६० टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 17:51 IST2025-05-13T17:50:04+5:302025-05-13T17:51:25+5:30
गेल्या वर्षी तालुक्याचा एकूण निकाल ९६.५५ टक्के लागला होता, यंदा हा निकाल १.०५ टक्क्यांनी वाढला आहे

SSC Result 2025: बारामतीत ८१ पैकी ४० शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा ९७.६० टक्के निकाल
बारामती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बारामती तालुक्यातील ८१ पैकी ४० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच तालुक्याचा एकूण दहावीचा निकाल ९७.६० टक्के लागला आहे. तालुक्यात ६५४४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी ७७ पैकी २९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. यंदा ८१ पैकी ४० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी तालुक्याचा एकूण निकाल ९६.५५ टक्के लागला होता. यंदा हा निकाल १.०५ टक्क्यांनी वाढला आहे.
तालुक्यातील शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढीलप्रमाणे: स्वातंत्र्य विद्या मंदिर ,वडगांव निंबाळकर, नव महाराष्ट्र विद्यालय पणदरे, श्री. भैरवनाथ जनसेवा विद्यालय उंडवडी,न्यू इंग्लीश स्कुल वाणेवाडी, विद्या प्रतिष्ठान बाल विकास मंदीर माध्यमिक शाळा बारामती,श्री शिरसाइ विद्यालय शिर्सुफळ,श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय भिकाेबानगर पणदरे,न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती चोपडज,श्री छत्रपती हायस्कुल सोनगांव,कै.जिजाबाइ गावडे विद्यालय पारवडी,शारदाबाइ पवार विद्यालय शारदानगर,न्यू इंग्लिश स्कुल मेखळी,विद्या प्रतिष्ठान मराठी मिडीयम स्कुल एमआयडीसी,बारामती.वसंतराव पवार विद्यालय देऊळगाव रसाळ,श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय देऊळगांव रसाळ,न्यू इंग्लीश स्कुल,गोजुबावी,न्यू इंग्लीश स्कुल,नारोळी.श्री.बी.एस.काकडे देशमुख विद्यालय निंबुुत,श्री भैरवनाथ विद्यालय कोर्हाळे,उर्दु माध्यमिक विद्यालय बारामती,उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा वाघळवाडी,जनहित प्रतिष्ठान विद्यालय बारामती,विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल बारामती,इंग्लीश मिडीयम स्कुल बारामती,कवि मोरोपंत शिक्षण संस`था माध्यमिक विद्यालय बारामती,श्री सिध्देश्वर पब्लीक स्कुल कोर्हाळे बु,,राजे प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल खंडुखैरेवाडी,अभिनव इंटरनॅशनल स्कुल बारामती,सोमेश्वर पब्लीक स्कुल,शारदा निकेतन इंग्लीश मिडीयम स्कुल,शारदाबाइ पवार विद्या निकेतन डे स्कुल, संत सावतामाळी प्रायमरी स्कुल,चैतन्याज इंटरनॅशनल स्कुल,क्रिएटीव्ह इंटरनॅशनल स्कूल बारामती, ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कुल सावळ, आदित्य इंटरनॅशनल स्कुल अॅण्ड.जु. काॅलेज वंजारवाडी. सुपे इंग्लीश मिडीयम स्कुल,बाकप इंग्लीश मिडीयम स्कुल,गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कुल,संत तुकाराम महाराज विद्यालय डोर्लेवाडी, न्यू इंग्लीश स्कुल खलाटे वस्ती लाटे, न्यू इंग्लिश स्कूल कारखेल, श्री छत्रपती हायस्कूल सोनगांव,शारदाबाई पवार विद्या निकेतन,शारदानगर, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक विद्यालय बारामती, ,श्री. विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर, सोमेश्वर विद्यालय आंबी बु,. बी. एस. काकडे देशमुख विद्यालय निंबुत, श्री भैरवनाथ विद्यालय कोऱहाळे खुर्द, उर्दू माध्यमिक विद्यालय बारामती, बाजीराव गावडे पाटील विद्यालय गुणवडी, ., विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडियम स्कूल बारामती, इंग्लिश मिडियम स्कूल माळेगाव, कवि मोरोपंत शिक्षण संस्था माध्यमिक विद्यालय बारामती, विजय बालविकास मंदीर माध्यमिक विद्यालय बांदलवाडी, श्री. सिध्देश्वर पब्लिक स्कूल कोऱहाळे बुद्रूक , सोमेश्वर पब्लिक स्कुल, सोमेश्वर, शारदाबाई पवार विद्या निकेतन डे स्कुल, संत सावतामाळी प्रायमरी स्कुल डोर्लेवाडी, सरस्वती माध्यमिक विद्यालय, चैतन्याज इंटरनॅशनल स्कुल,अजितदादा इंग्लिश मिडियम स्कूल कटफळ.