शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 05:40 PM2024-05-24T17:40:05+5:302024-05-24T17:40:20+5:30

शाळेला सुट्टी असल्याने ही मुले दुपारच्या वेळी शेततळ्याकडे गेल्याचा प्राथमिक अंदाज असून पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला

4 children who went swimming in the farm died due to drowning Incidents in Ambegaon Taluk | शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

मंचर: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे दुपारी साडेतीन वाजता घडली. श्रद्धा काळू नवले (वय 13),सायली काळू  नवले (वय 11), दीपक दत्ता मधे (वय 7) राधिका नितीन केदारी (वय 14)अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत.

मूळचे जवळे बाळेश्वर (संगमनेर)येथील कामगार गोरक्षनाथ बबन कवठे हे पत्नी ज्योती ,दत्तक मुली श्रद्धा काळू नवले व सायली काळू नवले यांच्यासमवेत निरगुडसर येथे राहून मजुरीचे काम करत होते. तर मूळचे कानेवाडी(ता. खेड) येथील तीन कुटुंब कामासाठी निरगुडसर येथे आले  सर्वजण पोंदेवाडी येथे शेतात काम करण्यासाठी गेले होते. मुले दीपक मध्ये व राधिका केदारी हे घरीच होते. दुपारी श्रद्धा नवले, सायली नवले, दीपक मधे, राधिका केदारी हे चौघे पोहण्यासाठी नजीक असलेल्या शेततळ्यात गेले. शेततळ्यात पाच ते सात फूट पाणी होते. पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात पाणी भरत असताना तेरा वर्षाचा सुरज गोरक्षनाथ कवठे हा मुलगा धावत येऊन त्याने चार जण पाण्यात बुडाल्याची माहिती दिली. त्यानंतर सुरज कवठे व त्यांची पत्नी ज्योती यांनी तातडीने शेततळ्याकडे धाव घेतली. या शेततळ्याला तारेचे कंपाउंड असून या तारेतून चौघे आत गेले होते. या चौघांना पाण्याबाहेर काढून तातडीने उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. श्रद्धा नवले ही इयत्ता सातवीत, सायली नवले ही इयत्ता पाचवीमध्ये , दीपक मधे हा दुसरीत निरगुडसर येथील शाळेत शिकत होते. राधिका केदारी ही पोंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत होती. शाळेला सुट्टी असल्याने ही मुले दुपारच्या वेळी शेततळ्याकडे गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भीमाशंकर कारखान्याच्या रुग्णवाहिकेतून मुलांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. कारखान्याचे कर्मचारी मदत करत होते. देवेंद्र शहा फाउंडेशनचे स्वप्निल मोरे यांनी मदत केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: 4 children who went swimming in the farm died due to drowning Incidents in Ambegaon Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.