शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्तांना ३७ कोटी दंड, वाहतूक पोलिसांकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:45 IST

पुणे शहर वाहतूकदृष्ट्या ‘बेशिस्ती’चे शहर म्हणून गणले जाऊ लागले असून गेल्या वर्षभरात बेशिस्त वाहनचालकांनी तब्बल ३७ कोटींचा दंड भरला आहे. वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाºया दंड वसुलीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक नियमभंग करणाºया वाहनचालकांची संख्या पोलिसांच्या कारवाईपेक्षा अधिक गतीने वाढत चालली आहे.

- लक्ष्मण मोरे

पुणे : पुणे शहर वाहतूकदृष्ट्या ‘बेशिस्ती’चे शहर म्हणून गणले जाऊ लागले असून गेल्या वर्षभरात बेशिस्त वाहनचालकांनी तब्बल ३७ कोटींचा दंड भरला आहे. वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाºया दंड वसुलीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक नियमभंग करणाºया वाहनचालकांची संख्या पोलिसांच्या कारवाईपेक्षा अधिक गतीने वाढत चालली आहे. वाहतूक शाखेने सुरू केलेल्या आॅनलाईन दंड वसुली आणि सीसीटीव्ही कारवाईमधून तब्बल ३२ लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.
शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली असून पुणेकरांमध्ये अद्यापही वाहतूक निरक्षरता मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहतूक नियमभंगाच्या पावत्या फाडण्याचा विक्रम पुणेकरांनी यंदाही कायम ठेवला आहे. सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेले पुणे शहर राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत वाहतूक नियमभंगामध्येही अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असे अभिमानाने सांगणारे पुणेकरांकडून वाहतूक नियमभंगासाठी ३७ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही दंडवसुली आतापर्यंत सर्वांत उच्चांकी दंडवसुली आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी विविध प्रकारच्या केलेल्या कारवायांमध्ये यामध्ये किरकोळ आणि सहज टाळता येण्याजोग्या चुका वाहनचालकांकडून अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. किरकोळ स्वरूपाचे वाहतुकीचे नियमही पाळण्यात वाहनचालकांची मोठी उदासिनता कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. एरवी टाळता येण्याजोग्या सिग्नल तोडणे, नो एंट्रीमध्ये वाहन घालणे, नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन लावणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, काळ्या काचा लावणे, जोरजोरात हॉर्न वाजविणे, कागदपत्र जवळ न बाळगणे, विरुद्ध दिशेने येणे, पदपथावर वाहन लावणे अथवा चालवणे यासोबतच फॅन्सी नंबर प्लेट, लेन कटिंग वाहनांना रिफ्लेक्टर न लावणे, रहदारीस अडथळा करणे अशा टाळता येण्याजोग्या चुका वाहन चालकांकडून झालेल्या आहेत.
किरकोळ स्वरूपाच्या वाटणाºया चुका केवळ दंड भरण्यापुरत्या मर्यादीत राहिलेल्या नसून या चुकांमुळेच अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अपघातांचे गांभिर्य कमी झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेदरकारपणा येऊ लागला आहे. विशेषत: दुचाकी आणि मोटार सायकलचालकांमध्ये हे प्रमाण अधिक पाहायला मिळते. वाहतुकीचे नियम वाहनचालकांच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आहेत याचा विसर वाहनचालकांना पडलेला आहे. केवळ वाहन चालवता आले म्हणजे झाले, असे नसून वाहतूक साक्षरता येणेही आवश्यक आहे.

विनाहेल्मेट कारवाई थंडावली
हेल्मेट वापर न करणाºयांवरील कारवाई थंडावली असून वर्षभरात २८ हजार जणांविरुद्ध हेल्मेट कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी १ कोटी ३९ लाख ६८ हजारांचा दंड वसूल केला आहे.

केंद्र शासनाने नवीन कायदा करून वाहतूक नियमभंगाच्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवायांमधील दंड वसुलीच्या रकमेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी वाहतूक पोलीस वर्षभर विविध प्रकारच्या जनजागृती मोहिमा घेत असतात़ यासोबतच स्वयंसेवी संस्था आणि शालेय विद्यार्थीही रस्त्यावर उतरून वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करत असतात़ मात्र, वाहनचालकांमध्ये अद्यापही वाहतुकचे नियम पाळण्याबाबत जागरुकता आलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे़

टॅग्स :Puneपुणे