शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीत ३२.९८ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: August 6, 2015 03:43 IST

जुन्नर व आंबेगाव या तालुक्यांतील ५ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नव्याने २५२ द़ ल़ घ़ फू. पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़

नारायणगाव : जुन्नर व आंबेगाव या तालुक्यांतील ५ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नव्याने २५२ द़ ल़ घ़ फू. पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ १ जूनपासून झालेल्या पावसाने १ हजार २४७ द.ल.घ.फू. पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ कुकडी प्रकल्पातील सर्व धरणांत ३२.९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १चे कार्यकारी अभियंता नन्नोर यांनी दिली़ दोन दिवसांपासून सलग पावसाला सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ दिवसभरात या पाचही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे धरणांची पाणीपातळी वाढू लागली आहे़ १ जूनपासून पाचही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १२५ द.ल.घ.फू. पाणी नव्याने उपलब्ध झाले आहे़ चिल्हेवाडी धरणातून १ हजार १५० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू असल्याने येडगाव धरणाचीही पाणीपातळी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे़ वडज धरणामध्ये ५७.१२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ३११ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ तर दिवसभरात ४ मिलिमीटर पाऊस झाला़ सतंतधार पाऊस राहिल्यास या परिसरातील धरणे लवकरच भरणार आहेत.माणिकडोह धरणामध्ये आजमितीस १८.१५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ४६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ दिवसभरात १० मिलिमीटर पाऊस झाला आहे़ पिंपळगाव जोगा धरणामध्ये आजमितीस ३८.१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ४७१ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ तर दिवसभरात १४ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे़ आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणामध्ये ४७.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ४४६ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ आज दिवसभरात ३ मिलिमीटर पाऊस पडाला, अशी माहिती नन्नोर यांनी दिली़ (वार्ताहर)