शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना 30 वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:18 IST

- लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना वैद्यकीय पुराव्यावरून न्यायालयाने 30 वर्षे सक्तजुरीची ...

-

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना वैद्यकीय पुराव्यावरून न्यायालयाने 30 वर्षे सक्तजुरीची शिक्षा सुनावली.

मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या कोंढवा खुर्द भागात वास्तव्यास असणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीला विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. याबरोबरच त्याला 15 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. वडिलांनी पोटच्या मुलीसोबत केलेला हा घृणास्पद प्रकार आहे. या प्रकरणात कमी शिक्षा दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी केली.

जून ते ऑक्‍टोबर 2019 या चार महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडला. विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी यामध्ये 8 साक्षीदार तपासले. वैद्यकीय पुरावा, तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांची साक्ष आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा नोंदविलेला जबाब महत्त्वाचा ठरला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार सचिन शिंदे, पोलीस शिपाई अंकुश केंगळे यांनी मदत केली.

मुलगी गर्भवती असल्याचेही निष्पन्न झाले. अचानक तिचा गर्भपात झाला. त्यानंतर 10 ऑक्‍टोबर 219 रोजी त्याने आई शेजारी झोपलेल्या पीडितेशी पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्याने दोघींना मारहाण केली. त्यानंतर दोघींनी जाऊन पोलिसात फिर्याद दिली.

या प्रकरणात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम (पास्को) 4 नुसार 30 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड, 323 (मारहाण) नुसार 1 वर्षे सक्तमजुरी, 506 (धमकाविणे) नुसार सहा महिने सक्तमजुरी, पास्को 8 नुसार 5 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंड, पास्को 12 नुसार 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.