शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेतून ३ कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: July 3, 2015 02:46 IST

महापालिका हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यापासून एकदाही कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राज्यशासनाने जाहीर केलेल्या अभय योजनेतून महापालिकेस मागील

पुणे : महापालिका हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यापासून एकदाही कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राज्यशासनाने जाहीर केलेल्या अभय योजनेतून महापालिकेस मागील महिनाभरात तब्बल २ कोटी ६१ लाख ६६ हजार ५१६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या योजनेच्या लाभासाठी शहरातील सुमारे ७१९ व्यावसायिकांनी एलबीटी विभागाकडे अर्ज केले असून, त्यांनी ३ कोटी २७ लाख ७९ हजार ८२१ रुपयांचा एलबीटी भरलेला नव्हता. या रकमेवरील व्याज माफ करून वरील रक्कम महापालिकेने वसूल केलेली आहे.१ एप्रिल २0१३ पासून राज्यातील २५ महापालिकांमध्ये एलबीटी लागू करण्यात आला आहे. मात्र, या करास राज्यातील व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने मागील वर्षी झालेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्तेवर येताच हा कर रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार येत्या १ आॅगस्ट २0१५ पासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा शासनाने केली आहे. मात्र त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी कर भरणे बंद केल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला असून, उत्पन्न दरमहा १३ ते १५ कोटींनी घटत आहे. त्यामुळे महापालिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्यशासनाने ही अभय योजना जाहीर केली आहे. त्यानुसार, एलबीटी लागू झाल्यापासून एकदाही कर न भरणाऱ्या व्यावसायिकांनी ३ जून ते ३१ जुलै २0१५ पर्यंत करभरणा केल्यास एलबीटीच्या रकमेवर असलेले व्याज व शास्ती माफ करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्तापर्यंत ७१९ व्यावसायिकांनी महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील ६0८ व्यावसायिकांनी २ कोटी ६१ लाख ६६ हजार रुपयांचा एलबीटी भरला असल्याचे एलबीेटी विभागाकडून कळविण्यात आले. (प्रतिनिधी)आॅगस्ट २0१५ पासून तपासणीएलबीटी विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ न घेता जे व्यावसायिक अथवा व्यापारी थकीत एलबीटी ३१ जुलैपर्यंत भरणार नाहीत, त्यांची तपासणीची कारवाई १ आॅगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्यावसायिकांनी कराचा भरणा मुदतीत करावा, असे आवाहन एलबीटी विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच ज्या व्यावसायिकांनी अद्याप विवरणपत्रे दाखल केलेली नाहीत, त्यांनीही ती त्वरित दाखल करावीत, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.