शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२३३ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त!

By admin | Updated: October 3, 2015 01:38 IST

जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींत १०० टक्के शौचालये बांधण्यात आली असून, ती हगणदारीमुक्त झाली आहेत. आज झालेल्या ग्रामसभांत या गावांतील ग्रामस्थांनी तसे ठराव केले असून

पुणे : जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींत १०० टक्के शौचालये बांधण्यात आली असून, ती हगणदारीमुक्त झाली आहेत. आज झालेल्या ग्रामसभांत या गावांतील ग्रामस्थांनी तसे ठराव केले असून, उघड्यावर न बसण्याची शपथ घेतली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. पुणे जिल्हाही यात आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या वर्षी प्रशासनाला मुळशी तालुका हगणदारीमुक्त करण्यात यश आले आहे. यंदा भोर व वेल्हे तालुक्यात १00टक्के शौचालये बांधण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. शासनाने यंदा या अभियानांतर्गत सुरुवातीला दिलेले ५५ हजार २८७ शौचालयांचे उद्दिष्ट निम्मे केले आहे. असे असतानाही जिल्हा परिषद प्रशासन रोटरीच्या साह्याने जिल्ह्यात जास्तीत जास्त कुटुंबांना शौचालये बांधून देण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेत झालेल्या दक्षता समितीच्या बैैठकीत याचा आढावा घेण्यात आला. या वेळी पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी राहुल साकोरे यांनी जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. या वेळी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील हगणदारीमुक्त ग्रामपंचायतीत २ आॅक्टोबरला होणाऱ्या ग्रामसभांत गाव हगणदारीमुक्त झाल्याचे ठराव घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज या २३३ गावांत ग्रामसभा घेऊन ठराव घेण्यात आले. हगणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींत मुळशी तालुक्याने ९५ पैकी ९५ ग्रामपंचायतींत (१00 टक्के) शौचालये बांधून पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच जिल्ह्यातील तालुका हगणदारीमुक्त करण्यातही त्यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर भोर तालुक्यात १५५ ग्रामपंचायतींपैकी २८, वेल्हे तालुक्यात ७0 पैकी २६ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त होऊन आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात सर्वांत मागे इंदापूर तालुका असून, तेथील ११३ पैकी फक्त २ ग्रामपंचायतींना १00 टक्के शौचालये बांधली आहेत. त्यानंतर दौंडमधील ७९ पैकी एकच ग्रामपंचायत आहे. (प्रतिनिधी)