डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:20 IST2025-03-18T09:20:17+5:302025-03-18T09:20:26+5:30

दररोज केसनंद ते डुडूळगाव हा त्याचा नेहमीचा रस्ता असताना अचानक डंपरने धडक होऊन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे

21-year-old youth dies in dumper accident Incident on D. Y. Patil College Road | डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना

डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना

लोहगाव: लोहगावमधील डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावर लोहगावकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला डंपरने धडक दिली. त्यामध्ये २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. स्वप्निल प्रकाश साळवे (वय २२) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वप्निल साळवे हा तरुण डुडूळगाव येथील कॅालेज संपवून डी. वाय. पाटील कॅालेजमार्गे केसनंदकडे मोटारसायकलवरून ( एमएच १४, एमडी ६३५७) जात होता. त्यावेळी हिंदुस्थान किराणा, मोझेनगर लेन नं. ३ समोरून जाणारा डंपर (एमएच १२ आरएम ४५५८) या वाहनाची त्याला धडक बसली. त्यामध्ये तो मागील चाकाखाली सापडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. डंपरचालक व्यंकट गुरप्पा पवार (रा. खांदवे निवास, निर्गुडी रोड, लोहगाव) हा पळून गेला. मात्र, पोलिसांनी त्याला शोधून काढले.

माहितीनुसार, स्वप्निल मूळ गाव यवत (ता. दौंड, जि. पुणे) येथील रहिवासी आहे. तो ज्ञानविलास कॅालेज ॲाफ फार्मसी डुडूळगाव येथे बी.फार्मला शिकत होता. केसनंद येथे मित्रांसोबत राहात होता. चंदननगर येथे मेडिकलवर कामाला होता. दररोज केसनंद ते डुडूळगाव हा त्याचा नेहमीचा रस्ता. अचानक डंपरने धडक होऊन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहें. या प्रकरणी माधव धोंडीबा साबळे (वय ५३, रा. एमआयडीसी डोंगरे वस्ती निघोज चाकण) यांच्या फिर्यादीवरून रात्री डंपरचालक व्यंकट गुरप्पा पवार यांच्यावर भा. न्याय. स. कलम १०६, २८१ एमव्ही १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विमानतळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय संकेश्वरी, उपनिरीक्षक अक्षय सोनवणे, चौकी अंमलदार, बिट मार्शल करीत आहेत.

Web Title: 21-year-old youth dies in dumper accident Incident on D. Y. Patil College Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.