पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बुधवारी (दि. २५) सकाळच्या सत्रात बारावीचा ‘जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास’ या विषयाचा पेपर झाला. यावेळी काॅपीचे एकूण २१ प्रकार समाेर आले आहेत. इयत्ता दहावीची दाेन सत्रांत परीक्षा हाेऊनदेखील राज्यभरात एकही काॅपीची घटना घडली नाही. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली.
दहावीसाठी सकाळच्या सत्रात द्वितीय किंवा तृतीय भाषा या विषयाची, तर दुपारच्या सत्रात द्वितीय वा तृतीय भाषा (संयुक्त अभ्यासक्रम) या विषयाची परीक्षा पार पडली. यामध्ये दहावीच्या दाेन्ही पेपरसाठी एकही काॅपीचा प्रकार घडला नाही, त्याउलट बारावीत मात्र २१ काॅपी प्रकार समाेर आले आहेत.
बारावी परीक्षेत बुधवारी आढळलेल्या काॅपी प्रकारामध्ये पुणे विभागात ७, छत्रपती संभाजीनगर १०, लातूर २ आणि मुंबई, अमरावती या विभागांतील प्रत्येकी १, असे एकूण २१ प्रकरणे तपासात पुढे आली. नागपूर, काेल्हापूर, नाशिक आणि काेकण विभाग निरंक राहिले आहे. पुणे, मुंबई, नाशिक, काेल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर आणि काेकण अशा विभागांमार्फत ही परीक्षा घेतली जात असून, दहावीत सर्व विभाग निरंक आहेत.
विभागीय मंडळनिहाय गैरमार्ग अवलंबलेल्यांची संख्या
विभाग - बारावी (जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास) - दहावी (द्वितीय वा तृतीय भाषा)
पुणे - ०७ - निरंकनागपूर - निरंक - निरंक
छत्रपती संभाजीनगर - १० - निरंकमुंबई - ०१ - निरंक
कोल्हापूर - निरंक - निरंकअमरावती - ०१ - निरंक
नाशिक - निरंक - निरंकलातूर - ०२ - निरंक
कोकण - निरंक - निरंकएकूण - २१ - निरंक
Web Summary : Maharashtra's Class 12 exams reported 21 cheating cases during Wednesday's Biology paper. In contrast, the Class 10 exams saw no instances of cheating across both sessions, according to the state education board. Pune, Chhatrapati Sambhajinagar, and Latur reported the most cases.
Web Summary : महाराष्ट्र में 12वीं की परीक्षा में बुधवार को जीव विज्ञान के पेपर में नकल के 21 मामले सामने आए। इसके विपरीत, 10वीं की परीक्षा में दोनों सत्रों में नकल का एक भी मामला नहीं आया, राज्य शिक्षा बोर्ड के अनुसार। पुणे, छत्रपति संभाजीनगर और लातूर में सबसे अधिक मामले सामने आए।