Pune Corona Alert: पुण्यातील वेल्हे तालुक्‍यात 20 जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 02:02 PM2022-01-13T14:02:02+5:302022-01-13T14:02:10+5:30

नागरिकांनी मास्क सॅनिटायझर वापर करावा व वारंवार हात धुवावेत गरज असल्यास घराच्या बाहेर पडावे

20 infected with corona in Velhe taluka of Pune | Pune Corona Alert: पुण्यातील वेल्हे तालुक्‍यात 20 जणांना कोरोनाची लागण

Pune Corona Alert: पुण्यातील वेल्हे तालुक्‍यात 20 जणांना कोरोनाची लागण

googlenewsNext

मार्गासनी : वेल्हे तालुक्‍यात 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अंबादास देवकर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. अंबादास देवकर म्हणाले, तालुक्यात आतापर्यंत वीस जणांना कोरोना ची लागण झालेली आहे. सध्या कोरोना ची लक्षणे सौम्य असून चार पाच दिवसात बरा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता त्रास होत असल्यास ताबडतोब जवळच्या शासकीय दवाखान्यात उपचारासाठी जावे तसेच एखाद्याला गंभीर लक्षणे असल्यास वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल व्हावे. 

तालुक्यातील तहसील कार्यालय पंचायत समिती येथील प्रशासकीय अधिकारी व व काही पदाधिकारी शासकीय कर्मचारी यांना देखील लागण झालेली आहे. सर्दी ताप किंवा त्यापेक्षा वेगळी लक्षणे असल्यास ताबडतोब शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी जावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. नागरिकांनी मास्क सॅनिटायझर वापर करावा व वारंवार हात धुवावेत गरज असल्यास घराच्या बाहेर पडावे गर्दी टाळावी असे आवाहन तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी केले आहे. तर बिना मास्क राहिल्यास तसेच जमाबंदीचे उल्लंघन केल्यास आणि तालुक्यातील राजगड तोरणा तसेच इतर पर्यटन स्थळावर येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी यावेळी केले. 

Web Title: 20 infected with corona in Velhe taluka of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.