मोकळ्या जागेत खेळताना वाहनाच्या चाकाखाली सापडला; २ वर्षीय बालकाचा मृत्यू, खराडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:06 IST2026-01-30T17:05:11+5:302026-01-30T17:06:19+5:30

मोकळ्या जागेत खेळणारा बालक दूध वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला होता

2-year-old boy found under vehicle's wheels while playing in open space; Kharadi incident | मोकळ्या जागेत खेळताना वाहनाच्या चाकाखाली सापडला; २ वर्षीय बालकाचा मृत्यू, खराडीतील घटना

मोकळ्या जागेत खेळताना वाहनाच्या चाकाखाली सापडला; २ वर्षीय बालकाचा मृत्यू, खराडीतील घटना

पुणे : वाहनाच्या चाकाखाली सापडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी परिसरात घडली. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मयूर अमर माळवे (२) असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी पिकअप वाहन चालक राजू मगन ढोले (६६, रा. बाळकृष्ण अपार्टमेंट, ढोले-पाटील रस्ता) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पूनम अमर माळवे (२५, रा. ढोले पाटील वाडा, खराडी ) यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम माळवे यांचा दाेन वर्षांचा मुलगा गुरुवारी (दि. २९) सायंकाळी सातच्या सुमारास घरासमोरील माेकळ्या जागेत खेळत होता. मोकळ्या जागेत ढोले यांचा गोठा आहे. दूध वाहतूक करणारे पिकअप वाहन घेऊन ढोले तेथे आले होते. मोकळ्या जागेत खेळणारा मयूर वाहनाच्या चाकाखाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गोडसे करत आहेत.

Web Title : पुणे के खराडी में वाहन से कुचलकर दो वर्षीय बच्चे की मौत

Web Summary : पुणे के खराडी में खेलते समय पिकअप ट्रक से कुचलकर दो वर्षीय मयूर मालवे की मौत हो गई। चालक राजू ढोले पर मामला दर्ज। ढोले गोशाला पहुंचे थे, तभी मयूर खेल रहा था। अस्पताल ले जाने पर मयूर को मृत घोषित कर दिया गया।

Web Title : Two-year-old dies after being run over in Pune's Kharadi.

Web Summary : A two-year-old boy, Mayur Malve, died in Kharadi, Pune, after being run over by a pickup truck while playing. The driver, Raju Dhole, has been charged. The incident occurred when Dhole arrived at his cowshed; Mayur was playing nearby. He was rushed to the hospital but died before treatment could begin.