पुण्यातील कोरोनामुक्तांचा आकडा पोचला दोन लाखांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 09:04 PM2021-03-13T21:04:46+5:302021-03-13T21:05:58+5:30

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ९ हजार ७६२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख ३९ हजार २६४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनामुक्तांचा आकडा पोचला दोन लाखांच्या पार शनिवारी १६३३ रूग्णांची वाढ, ६३८ रुग्ण झाले बरे : १२ रुग्णांचा मृत्यू

2 lakh patients recover from covid in Pune | पुण्यातील कोरोनामुक्तांचा आकडा पोचला दोन लाखांच्या पार

पुण्यातील कोरोनामुक्तांचा आकडा पोचला दोन लाखांच्या पार

Next

शहरातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या पार गेला आहे. आजवरच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के झाले आहे. तर, मृत्युदर २.३० टक्के एवढा आहे. शनिवारी दिवसभरात १६३३ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ६३८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३५१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १० हजार ७२३ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ७५५ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात १२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९३७ झाली आहे. पुण्याबाहेरील एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिवसभरात एकूण ६३८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ८०३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख १६ हजार ४६३ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १० हजार ७२३ झाली आहे.

 

 

Web Title: 2 lakh patients recover from covid in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.