शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

पुणे विभागात २ लाख ३३ हजार नागरिक दुष्काळाने बाधित    

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 6:55 PM

पुणे विभागात कोल्हापूर वगळता सातारा, सांगली,सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपुण्यात ४० तर साता-यात ४८ टँकर सुरू एकट्या माण तालुक्यातील बाधितांची संख्या ६८ हजारापेक्षा जास्त

पुणे: दुष्काळाची  तीव्रता वाढल्याने पुणे विभागातील दुष्काळाने बाधित झालेल्या नागरिकांची संख्या २ लाख ३३ हजार ८९१ वर गेली आहे.तर विभागातील १९ हजार ८०९ पशूधन दुष्काळाने प्रभावित झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे विभागातील १७ तालुक्यांमधील ८१२ वाड्या आणि ११६ गावांमध्ये १२० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.एकट्या माण तालुक्यातील बाधितांची संख्या ६८ हजारापेक्षा जास्त आहे.पुणे विभागात कोल्हापूर वगळता सातारा, सांगली,सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक २९५ वाड्या आणि ५० गावांमध्ये आणि पुणे जिल्ह्यात २८१ वाड्या आणि २४ गावांमध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे एकट्या सातारा जिल्ह्यात ४८ आणि पुणे जिल्ह्यात ४० टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.तर सांगली जिल्ह्यात २७ आणि सोलापूरमध्ये ५ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.सातारा जिल्ह्यात एकट्या माण तालुक्यात ६८ हजार ४९९ नागरिक दुष्काळाने बाधित झाले असून त्यांना ४० टँकर सुरू आहेत.तसेच खटाव,फलटण आणि कोरेगाव तालुक्यात उर्वरित एकूण १० टँकर सुरू आहेत.साता-यातील बाधित नागरिकांची संख्या ७८ हजार २५५ असून प्रभावित पशूधनाची संख्या १७ हजार ३६५ आहे.त्याचप्रमाणे सोलापूरात दुष्काळाने बाधित नागरिक १० हजार १९२ असून २ हजार २४४ पशूधन प्रभावित झाले असल्याचे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.-------------------पुणे जिल्ह्यातील दुष्काळाची तालुका निहाय आकडेवारी तालुका     बाधित नागरिक     टँकर्सची संख्या बारामती     ३१,७१७                    १६दौंड             १२,३८८                      ७पुरंदर           २,४०९                       २शिरूर          २१,४३४                     ११जुन्नर          ४,१८०                       २आंबेगाव       १,२८१                      २--------------------------------.......एकूण           ७३,४०९                         ४०

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळSatara areaसातारा परिसरSolapurसोलापूरSangliसांगली